Thursday 13 September 2012

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियाना अंतर्गत 28 शेतक-यांना पांच दिवसाचे प्रशिक्षण


         वर्धा दि.13-राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी, वर्धा यांच्‍या वतीने वर्धा, सेलु, देवळी या तालुक्‍यातील 28 शेतक-यांना ट्रेनिंग सेंटर, तळेगांव दाभाडे जिल्‍हा पुणे येथे पांच दिवसाचे प्रशिक्षणउदेण्‍याम आले. त्‍यामध्‍ये शेडनेट हाऊस व पॉली हाऊसमधील भाजीपाला व फुलपिके उत्‍पादन तंत्रज्ञान अवगत करणे करीता प्रशिक्षणासाठी पाठविण्‍यात आले. सदर प्रशिक्षणामध्‍ये उच्‍च तंत्रज्ञान आधारीत शेडनेट हाऊसमधील ठिंबक संचाव्‍दारे खत व्‍यवस्‍थापन, काकडी, ढोबळी मिरची, टोमॅटो, कारली, जरबेरा, गुलाब, कार्नेशन इत्‍यादी नगदी पिके व त्‍यांचे लागवड तंत्रज्ञान एकात्‍मीक किड व्‍यवस्‍थापन, नविन नविन जातीचा शेडनेट हाऊस, पॉली हाऊस मध्‍ये लागवड करुन जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन व उत्‍पादनात वाढ करुन निव्‍वळ नफा घडवून आणणे हा हेतू असून या प्रशिक्षणातून शेत-यांना प्रोत्‍साहीत करण्‍यात येत आहे. सोबतच मुल्‍यवर्धीत व विक्री व्‍यवस्‍था सामुहिक पध्‍दतीने करणे या करीता शेतक-यांना पाच दिवस प्रशिक्षण देण्‍यात आले.
सदर प्रशिक्षणाचा लाभ घेवून शेतकरी उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत भाजीपाला, व फुल पिके घेण्‍यास इच्‍छुक आहे. व पारंपारीक पिकाला भर देवून कमी दिवसात व सुरक्षीत अशा वातावरणात जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन काढणे व उत्‍पन्‍नात वाढ घडवून आणणे हा प्रशिक्षणा मागचा हेतू आहे. सदर प्रशिक्षणा करीता उपविभागीय कृषी अधिकारी, संतोष डाबरे व किसान अधिकारी अभीयानचे प्रेरक अविनाश काकडे यांनी शेतक-यांना प्रशिक्षण घेण्‍यासाठी मोलाचे सहकार्य केले.
                                      000000000

No comments:

Post a Comment