Tuesday 11 September 2012

स्‍टार स्‍वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍थेतर्फे फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींगचे निःशुल्‍क प्रशिक्षण


 वर्धा, दि. 11- सुशिक्षित बेरोजगार युवकांना  रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात  तसेच त्‍यांना  विविध विषयाचे प्रशिक्षण देण्‍यासाठी  ग्रामविकास मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन तसेच बँक ऑफ इंडिया यांच्‍या संयुक्‍त विदृयमाने डेरीफार्मी फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच खाद्य उद्योगा संदर्भात  निःशुल्‍क प्रशिक्षण  आयोजित करण्‍यात आले आहे.
       बँक ऑफ इंडियाच्‍या नालवाडी येथे प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये  दिनांक 21 नोव्‍हेंबर पासून या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. फोटोग्राफी  व व्हिडीओ शुटींग या संदर्भातील तीन आठवड्याचे प्रशिक्षण असून दिनांक 21 सप्‍टेंबरपासून  प्रशिक्षण सत्राला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षणासाठी   दहावी पास अथवा नापास , ग्रामीण भागातील युवकांची निवड करण्‍यात  येणार असून, उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थिची निवड प्राथमिक चर्चा करुन करण्‍यात येणार असून, प्रवेश अर्ज निःशुल्‍क असून, सात  दिवस आधी प्रशिक्षणासाठी  अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे.
       प्रशिक्षण कालावधी , निवास व्‍यवस्‍था, तसेच चहा, नास्‍ता  व भोजन विनामुल्‍य असून प्रशिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर  स्‍वःताचा   व्‍यवसाय सुरु करण्‍यासाठी बँकेत कर्ज प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
      प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करताना शाळा सोडल्‍याचा  दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील असल्‍यास  तसे प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट छायाचित्र सादर करावे.
           खाद्यपदार्थ व प्रक्रिया उद्योगाचेही दोन आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दि. 10 ऑक्‍टोंबर पासून सुरु होत आहे. प्रशिक्षण निशुल्‍क असून निवास व भोजनाची व्‍यवस्‍था संस्‍थेतर्फे विनामुल्‍य आहे.  वर्धा जिल्‍ह्यातील युवक व युवतींनी  या प्रशिक्षण सत्रामध्‍ये सहभागी होऊन आपला उद्योग सुरु करावा. प्रभारी अधिकारी , स्‍टार स्‍वरोजगार प्रशिक्षण संस्‍था,न्‍यु आर्टस कॉमर्स कॉलेज , गर्ल्‍स हॉस्‍टेल, नालवाडी, वर्धा येथे स्विकारण्‍यात येतील. अधिक माहितीसाठी दूरध्‍वनी क्रमांक  07152- 250250 वर संपर्क साधता येतील.
                                                                      0000

No comments:

Post a Comment