प्रसिध्दी पत्रक महाराष्ट्र शासन दि.15 /7/2011
जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा
------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.15- सेलू जि. वर्धा येथील सद्यास्थितीत सुरु असलेले दिवाणी व फौजदारी न्यायालय प्रफुल लुंगे यांचे खाजगी इमारतीमध्ये आहे.
दि. 17 जुलै 2011 पासून दिवाणी व फौजदारी न्यायालय रमेश एम. सोमनाथे यांचे खाजगी इमारतीमध्ये बुलडाणा अर्बन गोडवूनला लागुन, सुकळी स्टेशन रोड, सेलू येथे रविवार दि. 17 जुलै 2011 रोजी सकाळी 11 वाजता पासून स्थानांतरीत होत आहे. याबाबत सर्व अधिवक्ता, पक्षकार, ठाणेदार व इतर संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा यांनी कळविले आहे.
000000000
No comments:
Post a Comment