Monday 11 July 2011

ग्रंथालयांना अर्थसहाय्य योजना

                                 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.12 जूलै 2011
----------------------------------------------------------------  
            वर्धा,दि.12- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय  ग्रंथालय प्रतिष्ठानच्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी कार्यान्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते.
          त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना w.w.rrrlf.gov.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
          समान निधी योजने अंतर्गत राज्य शासनाच्या 50 टक्के व प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहाय्यामधून ही योजना राबविली जाते. यासाठी परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व ग्रंथ प्रदर्शने व वाचनसंस्कृती रुजविण्यासाठीचे उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार किंवा बांधणीसाठी फिरते ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
          असमान निधी योजना अंतर्गत ग्रंथालय सेवा देणा-या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ,साधनसामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये प्रतिष्ठानचे 75 टक्के व इच्छुक ग्रंथालयाचे 25 टक्के हिस्सा असावा. सार्वजनिक ग्रंथालयातील बालविभाग, महिला विभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभागासाठी प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य दिल्या जाते. असमान निधी अंतर्गत प्रतिष्ठानच्या सहाय्याने बाल विभाग स्थापन करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य. असमान निधी योजनांतर्गत महोत्सव वर्ष  50, 60, 75, 100 व 125 वे वर्ष किंवा 150 वे वर्ष साजरे करण्यासाठी प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य व शारिरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीसाठी विभाग स्थापन करण्यासाठी ग्रंथालयांना प्रतिष्ठानकडून 100 टक्के अर्थसहाय्य दिला जावा, असे सहाय्यक ग्रंथपाल संचालक, नागपूर कळवितात.
                                                000000

No comments:

Post a Comment