Saturday 16 July 2011

पालकमंत्र्यांनी तक्रारी व निवेदने स्विकारली

     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.16 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 16- येथील विश्राम भवना मध्ये सामान्य जनतेच्या तक्रारी, गा-हाणी व समस्या  जाणून घेण्यासाठी आज वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी  जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारामध्ये त्यांनी अनेक तक्रारी व निवदने स्विकारुन तक्रार धारकाचे समाधान केले. आली.
          याप्रसंगी जि.प.अध्यक्ष विजय जयस्वाल, जिल्हाधिकारी जयश्री भोज, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी लिना बन्सोड, अतिरीक्त जिल्हाधिकारी विनय मुन , निवासी जिल्हाधिकारी राजेश खवले आदि मान्यवर उपस्थित होते.
          या जनता दरबारामध्ये जनतेच्या तक्रारी, गा-हाणी ऐकून  मंत्रीमहोदयांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे तक्रारकर्त्यांचे समाधान झाले तर काही तक्रारकर्त्यांचे निवेदने संबधित विभागाकडे पाठविण्यात आले. त्यावर तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले. आज 100 ते 150 च्या दरम्यान तक्रारी व निवेदने प्राप्त झाली. त्यामध्ये महसुल विभाग, विद्यूत विभाग, कृषि विभाग, नगर पालीका, घरकुल पुर्नवसन, अल्पबचत पोष्टल एजन्ट कमिशन व इतर तक्रारीचा समावेश आहे.
          यावेळी मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते.
                                                   00000


No comments:

Post a Comment