Monday 11 July 2011

पत्रकारांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती परितोषिक योजना

          महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.312                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.11 जूलै 2011
------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.11- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत कार्यक्रमावर  आधारीत बातम्या, यशकथा, लेख, फिचर, टीकात्मक, मुळ योजनेवर सुधारक सुचविणे इत्यादी विविध स्वरुपात वृत्तपत्रातून लिखाण करण्याऱ्या अभियानाची व्यापक प्रसिध्दी करणाऱ्या वृत्तपत्र प्रधिनिधीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती पारितोषीक योजना शासनाव्दारे राबविण्यात येत आहे.
          उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या पत्रकारांची समितीमार्फत निवड करून जिल्हास्तरावर प्रथम 5000/- रु., व्दितीय.3000/- रु., तृत्तीय 2000/- रु अशी तीन रोख पारितोषीक जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे.जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या विजेत्याला राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येईल. सन.2010 ते 2011 या वर्षाच्या वरील पुरस्कारांसाठी वृत्तपत्रातून लिखाणाचा कालावधी 1 सप्टेबर 2010 ते   31 मे 2011 असा ग्राह्य धरण्यात येईल. पारितोषीकासाठी ज्या पत्रकारांकडून वैयक्तीकरीत्या अर्ज येतील त्याचा विचार करण्यात येईल. वर्तमानापत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकाच्या शिफारशीसह स्वीकराण्यात येईल.
          जिल्हास्तर पारितोषीकासाठी  मराठी, हिंदी इंग्रजी भाषेत प्रसिध्दी केलेल्या साहित्याचा यासाठी विचार करण्यात येईल. इच्छूक पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका 31 जूलै 2011 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, वर्धा यांचेकडे पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी , प्रशांत दैठणकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment