Friday 15 July 2011

दूधाच्या विक्री दरात वाढ

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.15  जूलै  2011
------------------------------------------------------------------------
         वर्धा,दि.15 - महाराष्ट्र शासनाने दूध ग्राहकांसाठी नविन विक्रीचे दर जाहिर केले असून, त्या दरानुसार ग्राहकांना दूधाची  खरेदी करावी लागेल. वाढीव दर तात्काळ प्रभावसह लागू झाले आहे.
नविन दराप्रमाणे गाईचे दूध 1 लिटर  पिशवितून रु. 27 ( रुपये सत्तावीस) व गाईचे दूध 500 मि.लि. पिशवीतून रु. 13.50 ( तेरा रुपये पन्नास पैसे) असेल.
शासनाने दिनांक 7 जुलै 2011 पासून गाईचे दूध विक्री दरात वाढ केल्यामुळे सध्या नविन पॉलिफिल्मचा पुरवठा होईपर्यंत जुन्या पॉलीफिल्म मधून दूधाचे वितरण करण्यात येईल. त्यावर जूनीच प्रिंट असली तरी दि. 7 जुलै 2011 पासुन गाईच्या 500 मि.लि.1/2  (अर्धा लिटर) करीता विक्री किंमत रुपये 13.50 राहील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. असे दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, वर्धा कळवितात.
                                00000000

No comments:

Post a Comment