Wednesday 13 July 2011

कार्यक्षम ग्रंथालयीन सेवेसाठी रिक्त पदे भरण्याच्या सुचना

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.13 जूलै   2011
-------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.13-शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी शासनाच्‍या आकृतीबंधानुसार कर्मचा-यांची पदे न भरता एकाच कर्मचा-यांना पूर्ण वेतनाची रक्कम देऊन दुस-या, इतर कर्मचा-यांची नियुक्ती केलेली नाही त्यामुळे ग्रंथालयाच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असून, वाचकांना आवश्यक, प्रभावी व कार्यक्षम ग्रंथालयीन सेवा मिळत नाही.
          नागपूर विभागातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयाच्या    पदाधिका-यांनी तातडीने आपल्या ग्रंथालयातील रिक्त पदे शासनाच्या आकृतीबंधानुसार भरण्याकरीता विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक ग्रंथालय संचालक, नागपूर या कार्यालयास सादर करावा. अन्यथा सन    2011-12 च्या  परिरक्षण अनुदानातून न भरलेल्या पदाचे अनुदान रिक्त पदाच्या प्रमाणात अमान्य करण्यात येईल आणि यासाठी संबंधीत सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी जबाबदार राहतील. असे सहाय्यक ग्रंथालय संचालक, नागपूर कळवितात.
                                                 000000

No comments:

Post a Comment