Monday 11 July 2011

डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे वितरण

          महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.313                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.11 जूलै 2011
------------------------------------------------------------------
            वर्धा,दि.11- देशातील लोकसंख्या अफाट वाढत असल्यामुळे भविष्यात देशातील नैसर्गिक संसाधने अपुरे व कमी पडणार आहे. लोकसंख्येच्या भष्मासुराला आळा घालण्यासाठी तसेच प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कंद्र व राज्य शासनाने ग्रामीण क्षेत्रामध्ये अनेक महत्वपूर्ण व परिणामकारक योजना कार्यान्वित  केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मोरेश्वर खोडके यांनी केले.
    जागतिक लोकसंख्या दिनानिमीत्य येथील जि.प.सभागृहात आरोग्य विभागाचे वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य बालेश मोरवाल, जि.प.सदस्य रमेश वरकड, सेलू पंचायत समितीचे उपसभापती दशरथराव नखाते, जि.प.उपमुख्य कार्यपालन अधिकारी व्हि.एस.बोंदरे, आर.एम.भुयार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड.राठोड, डॉ.पी.आर. धाकटे  यावेळी उपस्थित होते.
     वाढत्या लोकसंख्यमुळे भविष्यात देशाच्या  प्रगतीला आळकाठी बसेल असे सांगून सभापती खोडके म्हणाले की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामुळे ग्रामीण क्षेत्रातील आरोग्य संस्थेला नवसंजिवन प्राप्त झाले असून ग्रामीण लोकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर असून शासन परिणामकारक उपाय योजना करीत आहे. ग्रामीण खेत्रातील महिलांना आरोग्य शिक्षण देण्याचे कार्य प्रभावीपणे सुरु आहे. मात्र देशाची सर्वांगिण प्रगती साधण्यासाठी लोकसंख्येला आळा घालणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन  त्यांनी यावेळी केले.
     जि.प.सदस्य रमेश वरकड म्हणाले की देशाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी कडक धोरणाची उपाय योजना केली असताना ते धोरण यापूर्वी शिथील करण्यात आले होते. आता मात्र लोकसंख्येला आळा घालण्यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रबोधनात्मक आरोग्य शिक्षण प्रभावीपणे दिल्या जात असून वाढीव लोकसंख्येला मात्र काही प्रमाणात आळा बसला आहे. आरोग्‍य यंत्रणेने नियोजनबध्द पध्दतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाजाची मानसिकता बदलविण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राठोड यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राबविलेलया योजनांची माहिती देवून लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची  माहिती दिली.
यावेळी डॉ. धमाणे, डॉ. धकाते, श्रीमती परळीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरलेले हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय संस्थेल 50 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत केंद्रामध्ये प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा (मो) यांना 25 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह  व व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रा. आरोग्य केंद्र आंजी यांना 15 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह तसेच                             तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र हमदापूर यांना 10 हजार रुपये रोख व स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले उपकेंद्र बेढाना यांना 15 हाजर रुपये रोख, स्मृतीचिन्ह, व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक उपकेंद्र पाचोड यांना 10 हजार रुपये रोख स्मृती चिन्ह व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार उपकेंद्र नांदगांव यांना 5 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून संस्थेचे वैदृयकिय अधिकारी व त्यांच्या चमूना संबधीत संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुना गौरविण्यात आले.
डॉ. आनंदीबाई जोशी गौरव  पुरस्काराने हिंगणघाटचे उपजिल्हा रुग्णालयाला सतत 3 वर्षापासून पारितोषिक मिळत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे. वैद्यकिय अधिक्षक डॉ. धकाते, डॉ. जि.एन. दुघे, डॉ. विशाल रुहिकर, डॉ. डी.बी.खेडकर, डॉ. सौ. रेखा धकाते, डॉ. नंदा गेडाम व त्यांचे  कर्मचा-यांनी  अथक परिश्रम केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निमगडे यांनी केले तर संचलन डॉ.मिलन सोमलवार व आभार डॉ. धामट यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी हरीष पाटील व आरोग्य विभागाचे कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले. 
जागतिक लोकसंख्या दिना निमीत्ताने शालेय विद्यार्थ्यांची भव्य रॅली महात्मा गांधी विद्यालय येथून निघून प्रमुख मार्गावरुन फिरविण्यात आली.यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
                             0000
गो.117011/-






No comments:

Post a Comment