Thursday 14 July 2011

पुढील वर्षासाठी प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रम जाहीर

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.14  जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.14- सन 2011-2012 मध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे पायाभूत व प्रमाणीत बिजोत्पादन कार्यक्रम विविध बिजोत्पादन संस्था व शेतक-यांमार्फत घेण्यात येतो. पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे क्षेत्र नोंदणी करणे अनिवार्य आहे.
 क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करणे, शुल्क भरणे व विलंब शुल्कासह क्षेत्र नोंदणी करणे या संबधीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.उडीद, मुंग या पिकाच्या क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2011 व शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख  24 जुलै 2011 आहे. सं. कपाशी, सु. कपाशी, सोयाबीने, ज्वारी, बाजरी, भुईमुंग व इतर पिके क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख  27 जुलै 2011 व शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2011 आहे. भात रोवणी पिकासाठी क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख  20 ऑगस्ट 2011 व शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख  24 ऑगस्ट 2011 आहे. खरीप सुर्यफुल पिकासाठी क्षेत्र नोंदणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2011 व शुल्क भरणा करण्याची अंतिम तारीख  4 सप्टेंबर 2011 असेल.
          सर्व बिजोत्पादक संस्था व शेतकरी यांनी नजिकच्या जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नागपूर, वर्धा कार्यालयाशी संपर्क साधून पायाभूत व प्रमाणित बियाण्याच्या बिजोत्पादन क्षेत्राची नोंदणी विहीत मुदतीत करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी म.रा.वि.प्र.यंत्रणा,नागपूर कळवितात.
                                        000000

No comments:

Post a Comment