Wednesday 22 August 2012

आधुनिक शेतीसाठी युवा 40 शेतक-यांना पॉलीहाऊस


                                 ऋण प्रसंस्‍करण केन्‍द्राचा अभिनव उपक्रम
         वर्धा, दि.22– परंपरागत शेती ऐवजी  उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत  शेतीला चालना देण्‍यासाठी  वर्धा जिल्‍ह्यातील  युवा शेतक-यांना  पॉली हाऊसच्‍या माध्‍यमातून  आधुनिक शेती  करण्‍यासाठी  जिल्‍ह्याची  अग्रणी बँक असलेल्‍या बँक ऑफ इंडियाच्‍या  ऋण प्रसंस्‍करण केन्‍द्राने  अभिनव उपक्रमाची  सुरुवात केली आहे.
          शेतक-यांना खरीप व रब्‍बी  पिकांसाठी  कर्ज पुरवठा करत असतानाच  शेतक-यांनी  उच्‍च  तंत्रज्ञानावर आधारीत शेती करावी  तसेच  युवा शेतक-यांनी प्रगत  शेतीचा अंगीकार करावा  यासाठी   शेडनेट व पॉलीहाऊस  च्‍या  माध्‍यमातून भाजीपाला व फूलशेती करण्‍यासाठी  जिल्‍ह्यातील 40 शेतक-यांना    कृषि  ऋण प्रसंस्‍करण   केन्‍द्रातर्फे  अर्थसहाय्य  करण्‍यात आली असल्‍याची माहिती  या केन्‍द्राचे  वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक  एस.वाय. शिर्सीकर  यांनी आज दिली.
         जिल्‍ह्यातील शेतक-यांना या केन्‍द्रामार्फत मार्गदर्शन करण्‍यासोबत त्‍यांना शेती व शेती संलग्‍न पुरक उद्योगांना कर्जपुरवठा  करण्‍यात येत असून, प्रगत शेतीच्‍या तंत्रज्ञानासाठी सुलभपणे  व अल्‍पावधीत कर्ज प्रकरणे मंजूर  करण्‍यात येत असून  या योजनेचा जिल्‍ह्यातील शेतक-यांना  चांगला उपयोग होत आहे.  या केन्‍द्रातर्फे किसान क्रेडीट कार्ड, जमिन सुधारणा, हरितगृह (शेड नेट, पॉली हाऊस, कृषि विषयक यंत्रसामुग्री, दुध उत्‍पादक , पोल्‍ट्री फार्म, बकरी पालन, फूलशेती, फळबाग, तसेच सौर कुंपनासाठी या बँकेतर्फे शेतक-यांना सुलभपणे कर्जपुरवठा करण्‍यात येते.
         जिल्‍ह्याची अग्रणी बँक असलेल्‍या   बँक ऑफ इंडिया तर्फे मागील वर्षी  1 हजार 447 शेतक-यांना  34 कोटी 18 लाख रुपयाचा कर्ज पुरवठा करण्‍यात आला असून, यावर्षी  497 शेतकरी खातेदारांना 15 कोटी 75 लाख रुपये   कर्ज पुरवठा करण्‍यात आला आहे.
                             युवा शेतक-यांचे शेडनेट
          जिल्‍ह्यातील युवा शेतक-यांना  शेतीविषयक तांत्रिक माहिती देऊन  तसेच अत्‍याधुनिक माहिती च्‍या आधारावर शेडनेट व पॉलीहाऊस सुरु करण्‍यासाठी प्रोत्‍साहन दिले आहे त्‍यामुळे जिल्‍ह्यात शेडनेट व पॉली हाऊस व्‍दारे  मोठ्या प्रमाणात उत्‍पादनालाही सुरुवात झाली  आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील  मारोतराव झोटींग यांना  दोन पॉलीहाऊस साठी 24 लाख रुपयाचे कर्ज उपलब्‍ध करुन दिले असून, त्‍यांनी भाजीपाला व फुलशेतीचा अभिनव उपक्रम राबविला आहे.

        धानोरा येथे अशोक शंकरराव बुचे यांना पॉली हाऊस साठी 12 लाख रुपये तर हिंगणी येथील प्रगतीशील शेतकरी अजय डेकाटे , वाहीतपूर येथील जगदीश महाकाळकर , आर्वी येथील यामीनी महल्‍ले  , मोर्यापूर येथील रमेश राजाराम उमरे, धानोरा येथील रामदास बुचे, घोराड येथील त्रयंबक सोनबा माहुरे आदी  शेतक-यांना  4 लाख रुपायापासून  तर 18 लाख रुपयापर्यंत शेडनेट व पॉली हाऊससाठी  कर्ज पुरवठा उपलब्‍ध करुन दिला आहे.
           जिल्‍ह्याच्‍या अग्रणी बँकेतर्फे ग्रामीण भागातील 26 शाखाव्‍दारे शेतक-यांना कृषि विकासासाठी आवश्‍यक वित्‍त पुरवठ्यासह उच्‍च  तंत्रज्ञानावर आधारीत शेती करण्‍यासाठी कर्ज पुरवठ्यास तांत्रिक माहितीही  दिली जात असल्‍याची माहिती  वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापक  एस.वाय. शिर्सीकर यांनी  दिली.
                                                0000

No comments:

Post a Comment