Tuesday 21 August 2012

वाढत्‍या किंमतीला नियंत्रित ठेवण्‍यासाठी अन्‍न धान्‍यांची खुल्‍या बाजारातून विक्री


       वर्धा दि.21-  राज्‍यात वाढत्‍या किंमती नियंत्रित करण्‍याकरीता महाराष्‍ट्र शासनाने खुल्‍या बाजार विक्री योजने अंतर्गत (OMSS)(D) गहू 94.88 मे.टन व तांदुळ 8.52 टन भारतीय अन्‍न महामंडळ मार्फत उपलब्‍ध करुन दिलेला आहे.
         महामंडळ,सहकारी संस्‍था,फेडरेशन,स्‍वयंसहाय्यता बचत गट अथवा इतर शासकीय,निमशासकीय संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वितरीत करावयाचा आहे. तसेच राज्‍य शासनाच्‍या शैक्षणिक संस्‍था,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,स्त्रियांचे वसतीगृह इत्‍यादीसाठी करता येईल. याचप्रमाणे मासिक उपभोग 30 मे.टनापेक्षा गव्‍हाचे छोटे प्रक्रियादार उदाः चक्‍की ,बेकरी,इत्‍यादींना जो प्रथम येईल त्‍यास प्रथम वितरण या तत्‍वावर वितरीत करता येईल.
केंद्र शासनाचे गहू रु. 1170 व तांदूळ (कच्‍चा) अ प्रत रु.1537.31 साधारण रु.1492.54 हे खरेदी दर आहे. उपरोक्‍त दरावर एपीएमसी चार्जेस,ऑक्‍ट्राम,वाहतूक हाताळनूक व अनुषंगीक बाबीसह समाविष्‍ठ करुन विक्री दर ठरविण्‍यात येईल. परंतु विक्री दर प्रति क्विंटल गहू 1395 ब व तांदुळ (कच्‍चा) अ प्रत 1762.31 साधारण रु. 1717.54 यापेक्षा जास्‍त असणार नाही.
जिल्‍हाधिकारी यांनी निश्चित केलेल्‍या किंमतीने सदर गहू व तांदुळाची विक्री करण्‍यात येईल.
          उपरोक्‍त नमूद केल्‍यापेक्षा जास्‍त दराने गहू व तांदूळाची विक्री करता येणार नाही.विक्री करतांना शिधापत्रिकेची आवश्‍यकता भासणार नाही. गहू व तांदुळ अनुदानीत किंमतीचा फायदा सर्व सामान्‍य ग्राहकांना मिळावा हा शासनाचा मुख्‍य उद्देश असल्‍याने सामान्‍य ग्राहकांना उपलब्‍ध होईल. याची दक्षता घ्‍यावी. याबाबत दर,शर्ती व अटीची माहिती त्‍या-त्‍या तालुक्‍यातील तहसिलदार यांचे कार्यालयाकडून उपलब्‍ध होईल. गहू व तांदुळाची मागणी महसिलदार यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रासह त्‍वरीत नोंदवावी. असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment