Wednesday 22 August 2012

29 ऑगस्‍टला सद्भावना दौड


   
    2 हजार विद्यार्थी सहभागी होणार
           मानवी साखळीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन
   वर्धा, दि. 22- सामाजिक ऐक्‍य  तसेच  सदभावना  दिनाच्‍या  निमीत्‍ताने   दिनांक  17 ऑगस्‍ट ते 31 ऑगस्‍ट पर्यंत सामाजिक ऐक्‍य  पंधरवाडा  साजरा करण्‍यात येत असून, दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सदभावना दौड व सामाजिक ऐक्‍यासाठी   मानवी साखळी  तयार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती  निवासी उपजिल्‍हाधिकारी  श्रीमती विजया बनकर यांनी आज दिली.
       जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात  सदभावना दिवस व सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा साजरा करण्‍याचे संदर्भात वरिष्‍ठ अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक आयेाजीत करण्‍यात आली होती.
सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त जिल्‍ह्यात  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येणार असून यामध्‍ये  युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील  विविध धर्माच्‍या व अनेक भाषा बोलणा-या लोकांमध्‍ये एकात्‍मते विषयी ऐक्‍याची   भावना सौहार्द भावना वृध्‍दींगत करुन हिंसाचार टाळणे   हा पंधरवाडा साजरा करण्‍यामागची  संकल्‍पना आहे.
वर्धा जिल्‍ह्यात तसेच शहरात  सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त सदभावना दौड दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सकाळी 8 वाजता आयेाजीत करण्‍यात आली आहे. सदभावना दौड जिल्‍हा क्रिडा स्‍टेडीयम  येथून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, विश्रामगृह  मार्गे महात्‍मा गांधी चौक व जिल्‍हा स्‍टेडीयम येथे विसर्जीत होईल. या सदभावना दौडीमध्‍ये शहरातील विविध शाळांचे 2 हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्‍यांना सदभावना दिनाची शपथ दिली जाईल.
सामाजिक ऐक्‍य पंधरवाडा निमित्‍त सकाळी 8.30 वाजता महात्‍मा गांधी चौक ते जिल्‍हा स्‍टेडीयम पर्यंत मानवी साखळी तयार करण्‍यात येईल. व जनतेमध्‍ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्‍हावे यासाठी  पथनाट्यासह विविध कार्यक्रमाचेही  आयोजन करण्‍यात येईल.
जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, मुख्‍य कार्यपालन अधिकारी , जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ अधिकारी  यांच्‍या उपस्थितीत सदभावना दौडीला हिरवी झेंडी दाखविण्‍यात येईल. तसेच स्‍टेडीयमवर  विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्‍यात येईल. यावेळी वृक्षारोपनाचाही कार्यक्रम आयेाजीत करण्‍यात आला असलयाची माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी दिली. सदभावना दौडीसाठी समन्‍वयक म्‍हणून  जिल्‍हा क्रिडा अधिकारी  प्रदिप शेटीये हे काम पाहतील. स्‍थानिक व्‍यवस्‍था  वर्धा नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी  यांचेकडे सोपविण्‍यात आले आहे. उपविभागीय महसूल अधिकारी  हरिष धार्मिक व तहसिलदार  सुशांत बनसोडे हे कार्यक्रमाच्‍या आयोजनाचे समन्‍वयक अधिकारी म्‍हणून  काम पाहणार आहेत.
          यावेळी  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. सोनवने,  प्राथमिक व माध्‍यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी , पोलीस वाहतूक नियंत्रण अधिकारी , सामाजिक वनीकरण तसेच शहरातील विविध महाविदृयालयाचे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे प्राचार्य, जिल्‍हा व्‍यवसय व प्रशिक्षण अधिकारी आदी  यावेळी  उपस्थित होते.
                                      000000000

No comments:

Post a Comment