Tuesday 7 August 2012

जिल्‍हा पोलीस क्रीडा स्‍पर्धेचे थाटात उदघाटन



     वर्धा, दि. 7 – काल पोलीस मुख्‍यालयाच्‍या क्रीडांगणावर जिल्‍हा  पोलीस क्रिडा स्‍पर्धेचे उदघाटन  जिल्‍हा  पोलीस अधिक्षक अविनाशकुमार अप्‍पर पोलीस अधिक्षक टी.एस.गेडाम तसेच उत्‍तम  गालवाचे उपव्‍यवस्‍थापक अजयकुमार यांनी  क्रिडा ज्‍योत पेटवून  केले.
           यावेळी निवासी उपपोलीस अधिक्षक मुरलीधर नळे उपविभागीय पोलीस अधिकारी  मनोज पाटील, व्हि.एच.सुसतकर, पी.एस.देशमुख, पोलीस निरीक्षक बाबा डोंगरे, श्री, मिर्झा, श्री. कुहीकर आदी मान्‍यवर उपस्थित होते.
            याप्रसंगी प्रास्‍तावीक करताना अप्‍पर पोलीस अधिक्षक गेडाम म्‍हणाले की, पेालीस क्रीडा स्‍पर्धा दरवर्षी सातत्‍याने आयोजित केली जाते. जिल्‍हा पोलीस अधिक्षकांच्‍या  मार्गदर्शनाखाली संपन्‍न होणा-या या क्रीडा स्‍पर्धेमध्‍ये वर्धा मुख्‍यालय, हिंगणघाट, आर्वी , पुलगांव व वर्धा उपविभागातील 150 पेालीस सहभागी झालेले असून, या क्रीडा स्‍पर्धेमध्‍ये हॉकी, फुटबाल, हॉलीबॉल, कबड्डी व अॅथलीटीक च्‍या  सर्व प्रकारांचा या स्‍पर्धेत समावेश करण्‍यात आला आहे. स्‍पर्धकांनी आपली खेळाडू वृत्‍ती जोपासून सांघीक भावनेने  खेळ करावा, असे आवाहन त्‍यांनी  याप्रसंगी केले.
     क्रीडा स्‍पर्धेचे उदघाटन करताना उत्‍तम गालवाचे अजयकुमार म्‍हणाले की, पेालीसांना समाजाच्‍या संरक्षणाची जबाबदारी व कर्तव्‍यही पार पाडावी लागतात. यामुळे त्‍यांना शारिरीक व मानसिक तनावाला सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे  पोलीसांच्‍या आरोग्‍यावर सुध्‍दा विपरीत परिणाम होत असतो. मात्र क्रीडा स्‍पर्धेत पेालीस सहभागी  झाल्‍याने पेालीसांचे आरोग्‍य सुदृढ राहत असते. तसेच त्‍यांना तनावमुक्‍त जीवन जगता येते. क्रीडा  स्‍पर्धेत सहभागी झाल्‍याने  त्‍यांच्‍या कार्यक्षमतेत सुध्‍दा वाढ होते. असे सांगून  स्‍पर्धेत सहभागी  झालेल्‍या  खेळाडूंना त्‍यांनी शुभेच्‍छा  देवून क्रीडा स्‍पर्धेचे उदघाटन झालयाचे जाहीर केले.                                                                                                                          
     तत्‍पूर्वी सर्व क्रीडा स्‍पर्धकांनी  पथसंचलन करुन मान्‍यवरांना सलामी दिली. यावेळी उत्‍तम गालवाचे अनेक अधिकारी, पेालीस अधिकारी  व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन मुरलीधर नळे यांनी मानले.
                                                            00000

No comments:

Post a Comment