Tuesday 7 August 2012

लोकशाही दिनातील तक्रारी प्राधान्‍याने सोडवा - संजय भागवत




·        लोकशाही दिनात 71 तक्रारी दाखल
·        शेती, अतिक्रमण, नुकसान भरपाई संदर्भात तक्रारी
वर्धा,दि.7- जिल्‍हा लोकशाही दिन हा जिल्‍ह्यातील जनतेला आपली      गा-हाणी मांडण्‍याचे हक्‍काचे व्‍यासपिठ उपलब्‍ध झाले असून, लोकशाही दिनात 71 नागरिकांनी आपली गा-हाणी मांडली. अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी प्रत्‍येक नागरिकांच्‍या तक्रारीची दखल घेवून त्‍यांची गा-हाणी ऐकलीत.
      जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात 71 तक्रारी प्राप्‍त झाल्‍यात यात 41 नविन असून 30 जुन्‍या तक्रारी संदर्भात आपल्‍या मागण्‍याचे निवेदन सादर केले.
लोकशाही दिनात महिन्‍याच्‍या पहिल्‍या सोमवारी जिल्‍ह्यातील जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारीची दखल  घेवून त्‍या विविध विभाग प्रमुखांकडून  तीस दिवसात सोडविण्‍याबाबत संबंधित विभागांना पाठविण्‍यात येत असल्‍यामुळे जनतेच्‍या गा-हाणी व तक्रारीची दखल घेतली जाते. लोकशाही दिनात जनतेच्‍या तक्रारीची निराकरण होवून त्‍यांना योग्‍य न्‍याय देण्‍याचा जिल्‍हा प्रशासनाचा प्रयत्‍न राहातो.
     लोकशाही दिनात दाखल होणारी प्रत्‍येक तक्रार निर्धारित कालावधीत सोडवून त्‍या संदर्भातील माहिती तक्रार करणा-या नागरिकांनादेण्‍याची सूचना यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी विभाग प्रमुखांना केली.
      लोकशाही दिन सर्व विभाग प्रमुख उपस्थित असल्‍यामुळे जनतेची गा-हाणी तात्‍काळ सोडविण्‍यासही मदत होत आहे. यावेळी सहकार, नगर प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, पोलीस विभागाशी संबंधित तक्रारी संदर्भात तक्रार दाराला तात्‍काळ वस्‍तुस्थितीची माहिती देण्‍यात आली.
     जिल्‍हा परिषदे संदर्भातील तक्रारीची दखलही यावेळी घेण्‍यात येवून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्‍यात आला.
     लोकशाही दिनात प्राप्‍त होणा-या प्रत्‍येक तक्रारी संदर्भात विभाग प्रमुखाकडून वस्‍तुस्थिती तसेच तक्रारीचा निपटारा करण्‍या संदर्भात तात्‍काळ कार्यवाही करुन अहवाल मागविण्‍यात येत असल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
      यावेळी विविध विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
                                              000000

No comments:

Post a Comment