Friday 10 August 2012

राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियाना अंतर्गत कार्यशाळा


        वर्धा, दि. 10- जिल्‍हा परिषद वर्धाच्‍या आरोग्‍य विभागातर्फे जिल्‍ह्यातील सर्व तालुका आरोग्‍य अधिकारी व  वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्‍हा रुग्‍णालय, ग्रामिण रुग्‍णालय तसेच सर्व आरोग्‍य पर्यवेक्षक आणि आरोग्‍य कर्मचारी  यांच्‍या करीता राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य अभियान अंतर्गत जिल्‍हा स्‍तरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा सन 2012-13 या विषयावर  कार्यशाळेचे आयोजन दि. 2 ऑगस्‍ट 2012 रोजी जिल्‍हा प्रशिक्षण पथक येथे करण्‍यात आले.
            या कार्यशाळेचे उदघाटन प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  यांचे अध्‍यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. दिलीप माने , डॉ. एस.डी.निमगडे, स्‍वयंसेवी संस्‍थेचे प्रतिनिधी  अभयुदय मेघे यांचे उपस्थित दिप प्रजवलन करुन करण्‍यात आले.
       या कार्यशाळेचे प्रासताविक मध्‍ये बोलतांना डॉ. दिलीप माने  म्‍हणाले  जिल्‍हा सतरीय कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा व कार्यशाळचे आयोजनामागील भुमिका विषय केली.
       आपल्‍या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने  म्‍हणाले की जिल्‍ह्यातील सर्व गरोदर मातांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा पुरविल्‍यास  प्रसुतीमध्‍ये  होणारी गुंतागुंत टाळता येवून एक नविन सुदृढ पिढी निर्माण होईल. सर्व गरोदर मातांची प्रसुती ही शासकिय संस्‍थेतच व्‍हावयास पाहिजे यावर विशेष भर दिला तसेच आराखउ्याची अंमलबजावणी आरोग्‍य विभागातील शेवटच्‍या स्‍तरापर्यंत प्रभावीपणे करणे अतिशय महत्‍वाचे आहे. जेणे करुन जिल्‍ह्यातील प्रत्‍येक नागरिकांना गुणवत्‍तापुर्वक आरोग्‍य सेवा देता येईल.
      कार्यशाळेत इतर मान्‍यवरांनी  आपले मार्गदर्शनपर विचार व्‍यकत केले. यानंतर  डॉ. निमगडे यांनी सर्व विषयाच्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने सादरीकरणाव्‍दारे कार्यशाळेला मार्गदर्शन केले तसेच जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा  कार्यक्रमाचे, आशा योजना, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम, आय.पी.एच.एस.आर.के.एस. तसेच ईतर राष्‍ट्रीय कार्यक्रमाचे सादरीकरण त्‍यासंबधीत  समन्‍वयकाने  विभाग प्रमुखाने केले.
       या कार्यशाळेच्‍या आयोजनाकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ. राज गहलोत व  जिल्‍हा व्‍यवस्‍थापन अधिकारी डॉ. कु. अनुजा बारापात्रे यांच्‍या संपूर्ण कर्मचारी वृंदानी सहकार्य केले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन सुनिल गायधने यांनी केले.
                                                                0000000

No comments:

Post a Comment