Wednesday 8 August 2012

हातपंपाव्‍दारे मिळणार निर्जंतुंकीकरण पिण्‍याचे पाणी


नाविन्‍यपूर्ण संशोधन
                             वर्धाच्‍या युवा अभियंत्‍याचे संशोधन
       वर्धा, दि.8-ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी हातपंपाचा सर्वत्र वापर होतो. परंतू हातपंपाव्‍दारे मिळणारे पाणी शुध्‍द असतेच असे नाही. हातपंपामधून  येणा-या  पाण्‍यासोबतच क्‍लोरीनची  मात्रा मिसळून  शुध्‍द पाणी करण्‍याचे   संशोधन वर्धाचे युवा अभियंता  व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दिपक धोटे  यांनी  यशस्‍वीपणे  संशोधन केले आहे. अशा प्रकारचे  क्‍लोरी -डी  प्रथमच विकसीत झाले आहे.
ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी  सार्वजनिक विहीरीसह हातपंपाचा वापर मोठ्या  प्रमाणात  केल्‍या जातो. परंतू भुगर्भातून येणारे पाणी  शुध्‍द करण्‍यासाठी  कुठलीही  शास्‍त्रशुध्‍द व्‍यवस्‍था  अद्यापपर्यंत उपलब्‍ध नाही. पाण्‍यामध्‍ये  ब्लिचींग पावडर मिसळवून  पिण्‍याच्‍या पाण्‍याचा  पुरवठा केल्‍या जातो. परंतू हातपंपाव्‍दारे पिण्‍यासाठी वापरण्‍यात येणा-या पाण्‍यामध्‍ये  योग्‍य प्रमाणात  क्‍लोरीन मिसळल्‍या न गेल्‍यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलजन्‍य आजाराचा सामना करावा लागतो.
जनतेला शुध्‍द क्‍लोरीनेशन झालेले पाणी मिळावे यासाठी  युवा अभियंता दिपक धोटे यांनी सलाईन पध्‍दतीवर आधारीत क्‍लोरी -डी   नावाचे  हँडपंप  निर्जंतुकीकरण यंत्र विकसीत केले असून हे यंत्र  अत्‍यंत  अल्‍प किमतीत  शक्‍य झाले  आहे. तसेच हे यंत्र कुठल्‍याही  हातपंपावर सहजपणे  बसविणे शक्‍य आहे.
पिण्‍याच्‍या पाण्‍याचे  निर्जंतुकीकरण करताना ज्‍या पध्‍दतीने  सलाईन व्‍दारे रुग्‍णांना  औषध दिले जाते त्‍याच पध्‍दतीचा वापर करुन  हातपंपावर पाच लिटर  क्‍लोरीनचे मिश्रण  येईल या पध्‍दतीचे  पिव्‍हीसी  कंटेनर बसविण्‍यात आले.  या कंटेनर मधून क्‍लोरीनचे द्रावण व्‍दीपध्‍दतीव्‍दारे थेट भूगर्भातील पाण्‍यात मिसळविण्‍याची व्‍यवस्‍था तयार केली आहे. पाणी हातपंपाव्‍दारे काढताना या पाण्‍यामध्‍ये थेट क्‍लोरीन मिसळत असल्‍यामुळे  शुध्‍द पाण्‍याचा पुरवठा करणे सुलभ झाले आहे.
वर्धा जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात दिपक धोटे हे शाखा अभियंता म्‍हणून कार्यरत असून ग्रामीण भागात  पिण्‍याचे शुध्‍द पाणी  पुरविण्‍याची  जबाबदारी  असताना  ग्रामपंचायतमध्‍ये  पुरविण्‍यात येणा-या ब्लिचींग पावडरमध्‍ये  क्‍लोरीनचे प्रमाण  अल्‍प असल्‍यामुळे  तसेच क्‍लोरीन चुन्‍यामध्‍ये असल्‍याने  हातपंपामध्‍ये  मिसळतांना क्‍लोरीनचे प्रमाण कमी  तसेच चुन्‍याच्‍या द्रवणामुळे
 हातपंपातील पाईपही  खराब होण्‍याची  शक्‍यता  अधिक होती. क्‍लोरीन मिसळताना  हातपंप उघडणे व  भुगर्भातील पाण्‍यात क्‍लोरीन टाकने  अत्‍यंत  क्लिस्ट  काम
असल्‍याने  भुगर्भातील  थेट पाणी पिण्‍याशिवाय  जनतेला पर्याय नव्‍हता  त्‍यामुळे  जलजन्‍य आजारही  होण्‍याची  शक्‍यता अधिक असायची .
           हातपंपामधून  मिळणा-या पाण्‍यामध्‍ये क्‍लोरीनचे द्रवण मिश्रीत पाणी  देण्‍यासाठी  केलेल्‍या संशोधनाला यश आले असून, अशा प्रकारचे  क्‍लोरीनयुक्‍त  पाणी मिळण्‍याचे  हे बहुधा  पहिले संशोधन ठरले आहे.
क्‍लोरी-डी  हे निर्जंतुकीकरण करुन पाणी  पुरवठा करण्‍याच्‍या  संयंत्रासाठी  सुमारे 3 हजार 500 रुपये खर्च अपेक्षित असून हे सयंत्र तयार करण्‍यासाठी  स्‍थानिक  वर्धा येथीलच अनिल खैरकर यांच्‍या  कार्यशाळेत  हे यंत्र तयार करण्‍यात आले आहे. यासाठी  ग्रामीण पाणी पुरवठा  विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एल. बोरकर, सहाय्यक भूवैज्ञानिक  नितीन महाजन, उपअभियंता
श्री. अजय बेले, शाखा अभियंता  श्री. भगत यांचे सहकार्य लाभले आहे.  
                     क्‍लोरीन ऐवजी  सोडियम हायपोक्‍लोराईड 
          पिण्‍याच्‍या पाण्‍यामध्‍ये  सर्वत्र ब्लिचींग पावडरचा वापर करण्‍यात येतो. ब्लिचींग पावडरमध्‍ये सुमारे 33 टक्‍के क्‍लोरीन  आहे. ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी क्‍लोरीन  वापरताना त्‍याचा जास्‍त दिवस वापर केल्‍यामुळे  त्‍यातील क्‍लोरीनचे प्रमाण कमी होऊन चुना शिल्‍लक राहतो त्‍यामुळे  हातपंपाचे साहित्‍यही खराब होण्‍याचा धोका असतो.
          क्‍लोरीनेशन करताना  सोडीयम हायपोक्‍लोराईड  या द्रव स्‍वरुपातील  वापर केल्‍यास  60 टक्‍के पर्यंत  क्‍लोरीन चे प्रमाण उपलब्‍ध  होऊ शकते. क्‍लोरी-डी यामध्‍ये  सोडीयम हायपोक्‍लोराईडचा वापर सुलभ पध्‍दतीने करणे शक्‍य आहे.
                 क्‍लोरी-डी  या यंत्राव्‍दारे  हातपंपाच्‍या  सहाय्याने  थेट 200 फुटापर्यंत भूगर्भातील पाण्‍यामध्‍ये  क्‍लोरीन मिश्रण मिळविणे सहज सुलभ  आहे तसेच आयव्‍ही ट्युबचा वापर केल्‍यास  हातपंपामधून  येणा-या पाण्‍यासोबत आवश्‍यक असलेली  क्‍लोरीनची मात्रा मिसळून पिण्‍याचे शुध्‍द पाणी पुरवू शकत असल्‍याचे  यावेळी  शाखा अभियंता दिपक धोटे यांनी  सांगितले.
                     प्रधान सचिवांकडून  क्‍लोरी-डी पाहणी
          ग्रामीण भागात  हातपंपासोबत  क्‍लोरीन  मिश्रीत पाणी उपलब्‍ध   होणा-या क्‍लोरी-डी  या संशोधनाची  व उपकरणाची  पाहणी  राज्‍याच्‍या  पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या  प्रधान सचिव  श्रीमती मालीनी शंकर यांनी  केली. हातपंपासाठी  उपयुक्‍त असलेले  क्‍लोरी- डी  या  उपकरणाची पेटेंट करण्‍याची सुचना तयांनी  केली.
          जिल्‍हाधिकारी  शेखर चन्‍ने, पाणी  पुरवठा विभागाचे  अधिक्षक अभियंता  किरणकुमार कोसे यांनीही  क्‍लोरीन डी हे संयंत्र  पाणी निर्जंतुकीकरणासाठी  उपयुक्‍त असल्‍याचे  सांगि‍तले.
                                                                    
                                        ०००००००

No comments:

Post a Comment