Monday 12 December 2011

जिल्‍हास्‍तरीय क्रीडा सप्‍ताहाचे आयोजन


          
    वर्धा, दि. 12- महाराष्‍ट्र शासनाच्‍या  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2011 या कालावधीत क्रीडा सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
     महाराष्‍ट्र क्रीडा संस्‍कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा वातावरण निर्माण होण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयात या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय पारंपरिक व्‍यायाम प्रकार व खेळांचे प्रदर्शनी सामने, क्रीडा क्षेत्रातील तज्ञ तसेच नामांकित खेळाडू इत्‍यादींचे चर्चासत्र, निबंध व वकृत्‍व स्‍पर्धा, सायकल व मॅराथन स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.
      कार्यक्रमांचे आयोजन शाळास्‍तरावर करण्‍यात यावे व केलेलया कार्यवाहीचा अहवाल जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावा. अधिक माहितीकरीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.
                       00000 

No comments:

Post a Comment