Tuesday 13 December 2011

केंद्र पुरस्‍कृत शेतकरी अभ्‍यास दौरा

 वर्धा,दि.13- केंद्र पुरस्‍कृत गळीत धान्‍य विकास कार्यक्रमांतर्गत वर्धा, सेलू, देवळी या तालुक्‍यांमधून सन 2011-12 अंतर्गत शेतकरी अभ्‍यास दौ-याला उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौ-यास सुरुवात केली.
       पाच दिवसाच्‍या दौ-यामधे प्रमुख प्रादेशिक संशोधन केंद्र(सोयाबिन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अमरावती येथे सोयाबिनवरील संशोधनाचा अभ्‍यास, तालुका परतवाडा येथील चांगले उत्‍पादनक्षम संत्रा फळबागेची पाहणी, सोयाबिन अनुसंधान निर्देशालय, इंदोर येथे सोयाबिन लागवड तंत्रज्ञान, सोयाबिनवरील एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, सोयाबिनचे नविन वाण, सुधारित औजारांचा वापर, सोयाबिनवरील प्रक्रिया बाबतचे आधुनिक तंत्रज्ञान जसे सोयामिल्‍क, सोयापनीर, सोयावडी इत्‍यादी बाबींचे प्रशिक्षण मिळणार आहे.
     कृषि विज्ञानकेंद्र उज्‍जैन येथे नवीन संशोधित सोयाबीन वाणांची माहिती मिळणार आहे. त्‍यामुळे शेतक-यांचे पुढील हंगामामध्‍ये सायोबिनचे उत्‍पादन व उत्‍पादकता वाढवून निव्‍वळ नफ्यामध्‍ये वाढ करणे हा या शेतकरी अभ्‍यास दौ-याचा उद्देश आहे.
     या अभ्‍यास दौ-यामध्‍ये 100 शेतकरी सहभागी झाले आहेत.                    

No comments:

Post a Comment