Friday 8 June 2012

खरीप हंगामासाठी कर्जपूरवठा


कर्जमेळाव्‍याव्‍दारे
                         

·         हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात 12 जून पासून शुभारंभ
·         कर्ज मेळाव्‍यासोबत सातबारा व फेरफार  

वर्धा दि.8 – खरीप हंगामासाठी शेतक-यांना विविध बँकाकडून सुलभपणे कर्जपुरवठा मिळावा यासाठी मंडल स्‍तरावर कर्ज मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात 12 जून पासून कर्जमेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी उमेश काळे यांनी दिली.
         हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्‍यात दिनांक  12 ते 22 जून चक लरआचकह पर्यन्‍त प्रत्‍येकी आठ मेळावे राष्‍ट्रीयकृत बँकांच्‍या सहकार्याने आयोजित करण्‍यात येणार असून या मेळाव्‍यासोबत शेतक-यांना सातबारा, फेरफार तसेच महसूल विभागाशी संबंधित आवश्‍यक प्रमाणपत्रासाठी अर्ज स्विकारण्‍यात येणार  असल्‍याची माहिती श्री. उमेश काळे यांनी दिली.
         हिंगणघाट तालुक्‍यात शेतक-यासाठी आठ कर्ज मेळावे  आयोजित करण्‍यात येणार असून अल्‍लीपूर येथे 12 जून रोजी स्‍टेट बँक ऑफ इंडिया येथे, वडनेर 13 जून (ग्रामपंचायत) सावलीवारा व पोहणा 14 जून (ग्रामपंचायत) कलगांव 16 जून (बँक ऑफ इंडिया) हिंगणघाट 18 जून (तहसिल कार्यालय) शिरसगांव व वाघोली 22 जून बँक ऑफ बडोदा येथे आयोजित करण्‍यात आला आहे.
         समुद्रपूर तालुक्‍यात 11 जून पासून कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात आले आहे.माजगांव व कांढळी 11 जून (ग्रामपंचायत व बँक ऑफ इंडिया ) समुद्रपूर व नंदोरी 13 जून (तहसिल कार्यालय)  गिरड 13 जून (बँक ऑफ इंडिया) कोरा (ग्रामपंचायत) 14 जून वायगाव गोड (बँक ऑफ इंडिया) जांब (ग्रामपंचायत) येथे कर्ज मेळावे होतील.
         कर्ज मेळाव्‍यामध्‍ये महसूल, सहकार जिल्‍हा व राष्‍ट्रीयकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी, सरपंच व जिल्‍हा प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्‍याची माहिती उपविभागीय महसूल अधिकारी उमेश काळे यांनी दिली.
                                                             0000

No comments:

Post a Comment