Wednesday 6 June 2012

क्षयरुगणाची माहिती देणे खाजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांना बंधनकारक


                          
          वर्धा, दि. 6- क्षयरोग हा मायकोबॅक्‍टेरीया टयुबरक्‍यूलोसीस या जिवाणूमुळे होतो. निरोगी व्‍यक्‍ती थुंकी दुषीत क्षयरुग्‍णाच्‍या संपर्कात आल्‍यास त्‍याला क्षयरोग होण्‍याची शक्‍यता असते.निरोगी व्‍यक्‍तीच्‍या शरीरात क्षरोगाच्‍या जंतूचा शिरकाव झाल्‍यानंतर ज्‍या व्‍यक्‍तीची रोगप्रतिकार शक्‍ती चांगली आहे त्‍या व्‍यक्‍तीला ती उशीरा दिसून येतात.क्ष्‍यरुग्‍णाची लक्षणे दिसून आल्‍यानंतर त्‍या रुग्‍णाची माहिती सार्वजनिक आरोग्‍य यंत्रणेला देणे विषयी वैक्ष्‍कीय व्‍यवसायीकांना बंधनकारक आहे.
            15 दिवसाच्‍या वरील कालावधीचा खोकला,भूक मंदावणे,वजन कमी होणे, हलकासा परंतु सायंकाळी येणारा ताप, बेडक्‍यातून रक्‍त पडणे,छातीत दुखणे, चालतांना श्‍वास भरुन येणे,धाप लागणे, वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, कुपोषीत व्‍यक्‍ती, बालके,धुम्रपान करणा-या व्‍यक्‍ती मधुमेही व्‍यक्‍ती एच आय व्‍ही बाधित व्‍यक्‍ती फुफ्फुसाचे इतर विकार असलेली व्‍यक्‍ती.उदा. सिलिकोसीस,दमा,अस्‍थमा इत्‍यादी लक्षणे असल्‍यास अशा व्‍यक्‍तीनें थुंकी नमुना तपासून घेणे आवश्‍यक आहे.
            अशा लक्षणाच्‍या मध्‍यवर्गीय अथवा साधारण परिस्थिती असध्णा-या व्‍यक्‍ती हया सरकारी दवाखाण्‍यात येवून तपासणी करुन घेतात.परंतु सधन कुटूंबातील व्‍यक्‍ती इतरांना आपला रोग माहित होवू नये म्‍हणून खाजगी डॉक्‍टराकडे जावून उपचार घेतात.त्‍यामुळे अशा व्‍यक्‍तीची माहिती सरकारी यंत्रणेला कळत नाही.म्‍हणून केंद्र शासनाचे आदेशान्‍वये जिल्‍हयातील सर्व खाजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांनी  त्‍यांच्‍याकडे निदान व उपचारावर असणा-या क्षयरुग्‍णाची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा व जिल्‍हा क्षयरोग अधिकारी, जिल्‍हा क्षयरोग केंद्र, सामान्‍य रुग्‍णालय परिसर वर्धा यांना विहीत नमुन्‍यात दर महिन्‍याला कळवावी.तसेच जुने क्षयरोगी बरे झाल्‍याची माहिती देण्‍यात यावी.
            खाजगी डॉक्‍टरांचा उपचार घेणे कांही रुग्‍णांना परवडणारा नसल्‍यामुळे काही रुग्‍ण सरकारी दवाखान्‍याकडे वळतात व कांही रुग्‍ण आपली बदनामी होईल या भितीने सरकारी दवाखाण्‍यात न येता खाजगी डॉक्‍टरांचा अर्धवट उपचार घेवून मधात पैशाच्‍या अभावामुळे सोडून देतात.अशा अर्धवट उपचाराचे रुग्‍ण Multi Drug Resistance (MDR) होतात व त्‍यांना दोन वर्ष कालावधीच्‍या उपचाराला सामोरे जावे लागते. अर्धवट उपचारामुळे,अज्ञानामुळे समाजात असे बरेचशे (एमडीआर) रुग्‍ण वाढलेले आहे.क्षयरुग्‍णाच्‍या मृत्‍यूच्‍या प्रमाणात वाढ झाालेली आहे. त्‍यावर आळा बरावा, रुग्‍ण बरे दहोण्‍याच्‍या प्रमाणात वाढ व्‍हावी.हा यामागचा शासनाचा उद्देश असल्‍यामुळे खजगी वैद्यकीय व्‍यावसायीकांनी शासनाच्‍या उपक्रमाला सहकार्य द्यावे व आपल्‍याकडील क्षयरुग्‍नाची माहिती दर महिण्‍याला  जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व जिल्‍हा क्षयरोग अधिकारी यांना न चुकता कभ्ळवावी असे आवाहन  जिल्‍हा क्षयरोग अधिकारी,जिल्‍हा क्षयरोग केंद्र,वर्धा यांनी केले आहे.
                                                                0000          

No comments:

Post a Comment