Wednesday 6 June 2012

शेतकरी अजय अवचट यांच्‍या शेतीला प्रधान सचिव मालीनी शंकर यांची भेट


          वर्धा, दि. 6-सेलू तालुक्‍यातील वाहिदपूर येथे अजय अवचट  यांची फुलांची शेती असून कृषी विभागांच्‍या अनेक  योजना सुध्‍दा राबविल्‍या जाताता.पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या प्रधान सचिव तथा पालक सचिव मालीनी शंकर यांनी शेतकरी अजय अवचट यांच्‍या फुलशेजीला भेट देवून इतर कृषी विभागाच्‍या विकासात्‍मक योजनेची पाहणी केली. त्‍यांच्‍या समवेत जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा कृषी अधिक्षक, भाऊसाहेब ब-हाटे, जिल्‍हा कृषी अधिकारी, उस.जी.डाबरे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
            यावेळी राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियाना अंतर्गत पॉलीहाऊसची पाहणी केली.पॉली हाऊसमधील अद्यावत तंत्रज्ञान,लागवड खर्च,फुलांची विक्री,फर्टीगेशन,पिक संरक्षण, गटशेजी इ. विषयी माहिती जाणून घेतली.सोबतच  शेडनेट हाऊस मधील भाजीपाला उत्‍पादन व विक्री व्‍यवस्‍था,मालाचे साठवणुकीसाठी व प्रतवारीसाठी उभारण्‍यात आलेल्‍या पॅक हॉउसची उभारणी केली.वर्धा उपविभागामधील 30 सेडनेट हाऊस व 5 पॉली हाऊस आणि 3 पॅक हाऊसची उभारणी झााली असून शेतकरी उच्‍च तंत्रज्ञानावर आधारीत शेती करुन सिमला मिरची,काकडी,टमाटर, कारले इ. भाजीपाला पिका मधून 1.50 ते 2.00 लाख निव्‍वळ नफा एका हंगामामध्‍ये कमावत असल्‍याचे भेटीत शेतक-यांनी सांगितले.
            सेलू तालुक्‍यात राबविण्‍यात येत असलेल्‍या विदर्भ प्रवासी सिंचन कार्यक्रमातंर्गत मोहनापूर शिवारात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने उभारणीची लागवड करण्‍याचे तंत्रज्ञान तसेच प्रकल्‍पात इतर बाबी जसे ठिंबक संच,तुषार संच,शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण इ.बाबी 1000 हे क्षेत्राचे समुह स्‍वरुपात (क्‍लस्‍टर) राबविण्‍यात येणार असून कपाशीची हेक्‍टरी उत्‍पादनात वाढ करणे व कपाशीला शास्‍वत सिंचनाची व्‍यवस्‍था निर्माण करुन देणे, जेणे करुन शेतक-याचे उत्‍पादन व निव्‍वळ नफ्यात वाढ घडवून येईल.सदर प्रकल्‍पाची पाहणी केल्‍या नंतर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.सदर प्रकल्‍प भेटीचे वेळी मंडल कृषी अधिकारी सेलू झाडे,कृषी सहाय्यक गायकवाड इ. उपस्थित होते.
                                                      00000      


No comments:

Post a Comment