Thursday 7 June 2012

शेतक-यांना पीक कर्ज वाटपासाठी जिल्‍हयात 11 जून पासून कर्ज वाटप मेळावे - श्रीमती जयश्री भोज


                                                                                                     
    
·         85 हजार 855 शेतकरी खातेदार
·         खरीपासाठी 449 कोटी 13 लाखाचे नियोजन
·         सर्व राष्‍ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटण्‍याच्‍या सूचना
·         मंडळ स्‍तरावर कर्ज मेळावे
·         शेतक-यांनी कर्ज मेळाव्‍याचा लाभ घ्‍यावा.

वर्धा,दि.7 शेतक-यांना खरीप हंगामासाठी आवशकतेनुसार लवकर कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी मंडळ स्‍तरावर कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात येणार आहे.जिल्‍हयातील सर्व शेतक-यांनी कर्ज मेळाव्‍यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.कर्ज मेळावे मंडळ स्‍तरावर 11 जून पासून आयोजित करण्‍यात येणार आहे.
         पीककर्ज वाटण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत व खाजगी बँकांना 488 कोटी 19 लाख रुपयाचा कृषीकर्ज पतपुरवठा निश्चित करण्‍यात आला आहे.कृषी पतधोरणाचा लाभ जिल्‍हयातील 93 हजार 30 शेतक-यांना मिळणार आहे. खरीप पीक हंगामासाठी 85 हजार 588 शेतकरी कृषी खाते धारकांसाठी 449 कोटी 13 लाख रुपये खरीप कर्जाचे उद्दीष्‍ट  निश्चित केले आहे.
         शेतक-यांना लवकर कर्ज उपलब्‍ध होण्‍यासाठी मंडळस्‍तरावर 11 जून पासून कर्ज मेळावे आयोजित करण्‍यात आले आहेत. कर्ज मेळाव्‍यामध्‍ये महसूल,बँक तसेच सहकारी संस्‍थाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहतील. यावेळी शेतक-याकडून  पिक कर्जाचे अर्ज भरुन घेण्‍यात येतील अशी माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
         मंडळ स्‍तरावर आयोजित करण्‍यात येणा-या कर्ज मेळाव्‍याचा कार्यक्रम निश्चित करण्‍यात आला आहे. पुलगांव येथे दिनांक 11 जून रोजी ललिताबाई मोरारका हायस्‍कूल, दिनांक 12 जून रोजी अंदोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय व देवळी येथील नगरभवन, दिनांक 13 जून रोजी गीरोली येथील ग्रामपंचायत येथे. 16 जून रोजी विजयगोपाल येथील यशवंत हायस्‍कूल, 17 जून रोजी भिडी येथील यशवंत हायस्‍कूल येथे कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
                                              वर्धा तालुका
         वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांना कर्ज वाटपासाठी मंडळ स्‍तरावर तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक 12 जून पासून  कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
         सेवाग्राम येथे 12 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय. वर्धा येथे 13 जून रोजी तहसिल कार्यालय व तळेगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय. वायफड,वायगांव व आंजी येथे 14 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय तसेच सालोड येथे 15 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
                                              खरीपसाठी 449 कोटी 13 लाख
         जिल्‍हा कृषी कर्ज पतधोरणानुसार अग्रीणी बँकेनी वाणिज्‍य जिल्‍हा व खाजगी बँकांना खरीपासाठी पीककर्जाचे  449 कोटी 13 लाख रुपयाचे कर्ज वाटपाचे धोरण निश्चित केले आहे. याचा लाभ 85 हजार 588 खातेदार शेतक-यांना मिळणार आहे.
         खरीप पिककर्ज वाटपासाठी वाणिज्‍य बँकांना 391 कोटी 26 लाख रुपयाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले आहे. तसेच खाजगी बँकांना 6 कोटी 27 लाख जिल्‍हा बँकांना 47 कोटी रुपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट आहे. वैनगंगा कृष्‍णा ग्रामीण बँकेने 14 कोटी 64 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आल्‍याचे माहिती अग्रणी बँकेचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक एम.बी. मशानकर यांनी दिली.                                                                                           
         खरीप पीककर्ज वाटपासाठी सर्वाधिक स्‍टेट बँक ऑफ इंडियाला 21 हजार 243 खातेदार शेतक-यांना  121 कोटी 29 लाख, बँक ऑफ इंडियाला 16 हजार 983 खातेदारांना 110 कोटी 83 लाख, बँक ऑफ महाराष्‍ट्रला 7 हजार 774 खातेदारांना 50 कोटी 19 लाख, बँक ऑफ बरोडा 2 हजार 576 खातेदारांना 20 कोटी 91 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 4 हजार 885 खातेदारांना 23 कोटी ,पंजाब नॅशनल बँकेला 20 कोटी 91 लाख, युनियन बँक 3 कोटी 14 लाख, सिंडीकेट बँक 2 कोटी 9 लाख, आंध्र बँक 1 कोटी 57 लाख रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले आहे. 
         मंडळ स्‍तरावर आयोजित कर्ज मेळाव्‍यास शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून खरीप हंगामास आवश्‍यकतेनुसार कर्जासाठी विहीत अर्ज मेळाव्‍यात सादर करावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                             0000
                                    

No comments:

Post a Comment