Friday 8 June 2012

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्‍यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी



                                   
पृथ्‍वीवर  ऋतुचे चक्र अव्‍याहत पणे सुरु असते.चार महिण्‍यानुसार एक ऋुतू ठरलेला असतो.त्‍यामध्‍ये उन्‍हाळा,पावसाळा व हिवाळा हे ऋुतू क्रमशाह येत असतात. परंतु पावसाळा म्‍हटल की अतिवृष्‍टी ,नदी व नाल्‍यांना येणा-या पुरामुळे होणारी जीवीत व वित्‍त हाणी तसेच विजेच्‍या अपघातामुळे होणारी हाणी ठरलेली असते. ती आकस्मिक असल्‍यामुळे प्रशासनाला नव्‍हेतर शासनाला मदतीचा हात द्यावा लागतो. यासाठी प्रशासन दक्ष असून या आपातकालीन परिस्थितीमध्‍ये प्रशासनाने अधिका-यांशी समन्‍वय ठेवून संपूर्ण तयारी केली आहे.
शोधन व बचाव पथकाचे गठण
        पावसाळयामध्‍ये नदी व नाल्‍यांना पूर येवून नदीकाठावरील गावे पाण्‍याखाली येतात ही परिस्थिती अतिवृष्‍टी व सततधार पावसामुळे उदभभवते  ही आपातकालीन परिस्थिती तातडीने हाताळण्‍यासाठी प्रत्‍येक गाव स्‍तरावर, तालुका पातळीवर बचाव व मदत कार्यासाठी शोध व बचाव पथक स्‍थापण्‍यात आलेले आहे.यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहे. शहरी भागासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनेबाबत नगरपालिकांना आवश्‍यक सूचना दिल्‍या असून समाजकार्य महाविद्यालयाचे  निवडक 40 विद्यार्थ्‍यांचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन स्‍वयंसेवक पथक निर्माण करण्‍यात येणार आहे. त्‍यांचे प्रशिक्षण सुध्‍दा लवकर होणार आहे.
                                              वेबसाईटवर  पूरपरिस्थितीची कार्यपध्‍दती
          जिल्‍हयाची पूरपरिस्थितीची कार्यपध्‍दती नव्‍याने तयार करण्‍यात आली असून ती जिल्‍हयाच्‍या वेबसाईटवर टाकण्‍यात आला आहे.तसेच प्रशासनाकडून जनजागृती करण्‍याचे कार्यक्रम व आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचा सामना कशाप्रकारे करण्‍यात यावा याबाबत पुस्‍तके छापून वितरीत करण्‍यात आली आहे.
                                                  संदेश वहन यंत्रणा
          आपातकालीन परिस्थितीमध्‍ये संदेश वहन यंत्रणा  महत्‍वाची असून  ती सुर‍क्षित राहावी यासाठी प्रशासन योग्‍य ती काळजी घेत आहे.यासाठी जिल्‍हा स्‍तरावर  स्‍वतंत्र नियंत्रण कक्ष स्‍थापित करण्‍यात आले असून त्‍यासाठी  अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहे. जिल्‍हा आपात व्‍यवस्‍थापन अधिकारी म्‍हणून किशोर सोनटक्‍के यांचेकडे कार्यभार देण्‍यात आला आहे. संपर्कासाठी कार्यालयातील दूरध्‍वनी क्रमांक 243446 असा आहे. तसेच याच कक्षात निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचा दूरध्‍वनी क्रमांक 240872 च्‍या क्रमांकावर संदेश देता येईल. मोबाईलवरुन एसएमएस करुनही परिस्थितीच्‍या बाबत विचारणा करण्‍यात येते. नियंत्रण कक्ष 1 जून पासून 24 तास कार्यान्वित झाला आहे.
                                                पर्जन्‍य मापक यंत्रे
         जिल्‍हयातील प्रत्‍येक मंडळस्‍तरावर पर्जन्‍य मापक यंत्र बसविण्‍यात आले असून ते सुस्थितीत राहण्‍यासाठी संबंधितांना सूचना देण्‍यात आल्‍या आहे. अतिवृष्‍टीची माहिती पर्जन्‍य मापक यंत्राव्‍दारे मिळणार असल्‍याने शेतक-यांना त्‍याचा मोठा फायदा होण्‍याची शक्‍यता आहे. पावसामुळे शेतीची होणारी  हाणी  तसेच पिक परीस्थितीची माहिती  या यंत्रणेव्‍दारे प्रशासनाला कळणार असल्‍याने याचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.                                                                                           

नदीकाठावरील गावे
            सेलू तालुक्‍यातील धाम  नदीच्‍या काठावर येळाकेळी, सुकळीबाई, घोराड,कोपरा, चांणकी, खडका, बोरी, सोई,  किन्‍ही, हिंगणी, सेलू, सिरसमुद्रपूर, बाभुळगांव, सुरगांव, वडगांव कला  ही गावे बसलेली
आहे.देवळी तालुक्‍यात वर्धा नदीच्‍या काठावर तांभा,अंदोरी, आंजी,नांदगांव,सावंगी (मे) हिवरा,खर्डा,शिरपूर होरे, गुंजखेडा,पुलगांव,बाभुळगांव (पु), कांदेगांव, कविटगांव बोपापूर वाणी ही गावे नदी काठावर येत असून यशोदा  नदीच्‍या काठावर बोपापूर, सोनेगांव व दिघी ही गावे बसलेली आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील वना व वर्धा नदीच्‍या काठावर हिंगणघाट, कान्‍होली कात्री व पोटी ,पोथरा नाल्‍यावर पारडी, लहान व मोठा कोसुर्ला ही गावे वसलेली आहे. समुद्रपूर तालुक्‍यात वणा नदी काठावर वाघसूर,कोढाळी, कानकाठी, कोटी, सेवा, चाकूर, महागांव, उमरी व कुर्ला नांद व धाम नदी काठावर धानोली,सावंगी (दे) व नांदरा, बोर व कोथरा नदी काठावर डोंगरगांव, लालनाला प्रकल्‍पाचे प्रवाहाच्‍या काठावरील गावे कोरा व पवन, आष्‍टी तालुक्‍यातील वर्धा नदीवर बेलोरा, टेकाडा, वाघोली ,सिरगांव, बेलोरा (खु.), अंतोरा (जुना) काकडी नदीवरील गावे चिस्‍तुर ,तळेगांव मेलाई नदीच्‍यास काठावर अजीतपूर व कारंजा ,कारंजा तालुक्‍यातील कार नदीच्‍या काठावरील गावावर काकडा व परसोडी ही गावे पूरग्रस्‍त म्‍हणून ओळखली जातात. अतिवृष्‍टी असो की  सततधार पावसामुळे नदी व नाल्‍यांना आलेल्‍या पूरामुळे  या गावातील गावक-यांना मोठा फटका बसत असतो.
       याशिवाय पूरग्रस्‍त गावे म्‍हणून वर्धा तालुक्‍यात नदीकाठावरील 31 गावे, आर्वी तालुक्‍यात 22 गावे आहेत. सेलू तालुक्‍यात नदीकाठावर 39 गावे असून पुरांचा अतिधोका असणा-या गावांची संख्‍या 15 आहे. देवळी तालुक्‍यात नदीकाठावरील 25 गावे असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 16 आहे. हिंगणघाट तालुक्‍यात नदीकाठावरील गावांची संख्‍या 24 असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 7 आहेत. समुद्रपूर तालुक्‍यात नदीकाठावरील गावांची संख्‍या 35  असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 15 आहे. आष्‍टी तालुक्‍यात  नदीकाठावरील गावांची संख्‍या 14 असून पुराचा अतिधोका असणा-या गावाची संख्‍या 10 आहे. कारंजा  तालुक्‍यात  नदीकाठावरील गावांची संख्‍या 11 असून दोन गावे पुरग्रस्‍त  समजण्‍यात येतात.
            पूरग्रस्‍त गावांना वैद्यकीय सेवा व औषधाचा पुरवठा करण्‍यासोबत धान्‍याचा आवश्‍यक साठा सुध्‍दा करुण ठेवण्‍याच्‍या सूचना संबंधित यंत्रणेला जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिल्‍या. पूरग्रस्‍त परिस्थितीमध्‍ये तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापनातील जिल्‍हास्‍तरावर नियंत्रण कक्षाची  सेवा 24 तास अविरतपणे सुरु राहील त्‍यामुळे पुरग्रस्‍त लोकांना आवश्‍यक ती मदत देवून मदत कार्य सुरळीत सुरु असल्‍याची खात्री पटविता येईल.
          आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी यंत्रणा कामाला लागलेली असून त्‍याचे सकारात्‍मक परिनाम लवकरच दिसून येतील यात शंका नाही.
                                                          

No comments:

Post a Comment