Thursday 7 June 2012

अपंगासाठी मोफत संगणकीय प्रशिक्षण


       वर्धा दि.7- अपंग कल्‍याण आयुक्‍तालय व सांगली जिल्‍हा परिषद तर्फे पौढ अपंगासाठी संगणकीय व व्‍यावसायीक मोफत प्रशिक्षण देण्‍यात येते. या संस्‍थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्‍ट्र राज्‍य व्‍यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ,मुंबईची शासन मान्‍यता आहे. तसेच एम.एस.सी.आय.टी. या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्‍हणून शासन मान्‍यता आहे.
            सन 2012-13 या चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्टिफिकेट इन कॉम्‍युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफीस (संगणक कोर्स) (किमान इ. 8 वी पास) 25 जागा, सबमर्सिबल सिंगल फेज थ्री फेज मोटर अॅण्‍ड अर्मिचर रिवायडींग (किमान इ. 9 वी पास) 25 जागा,एम.एस.सी.आय.टी. वरील सर्व 50 विद्यार्थ्‍यासाठी प्रवेश देण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष फक्‍त अपंग मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.
            प्रशिक्षण कालावधीत राहण्‍याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्‍टीकल्‍स व व्‍यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्‍वल यशाची परंपरा, समाज कल्‍याण विभागाकडून स्‍वयंरोजगारासाठी,व्‍यवसायासाठी बीज भांडवल योजना आदी सुविधा आहे.
          प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक,शासकीय पौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्‍हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता.मिरज,जि.सांगली पिनकोड क्र. 416410  फोन क्र.0233-2222908 मोबाईल क्र. 9881609940,9922577561 या पत्‍यावर पोस्‍टाव्‍दारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्‍थेकडे पाठवावेत. किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्‍याचा दाखला, अपंगत्‍व असल्‍याबाबतचे सक्षम  अधिका-याचे प्रमाणपत्र व उत्‍पन्‍नाचा दाखला यांच्‍या झोरॉक्‍स प्रती जोडाव्‍यात.प्रवेश अर्ज संस्‍थेकडे 25 जुलै,2012 पुर्वी पो‍हचतील अशा बेताने पाठवावेत.प्रवेश अर्ज प्राप्‍त झाल्‍यानंतर तज्ञ समिती व्‍दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्‍यात येईल.
                                                   00000

No comments:

Post a Comment