Wednesday 6 June 2012

49 गावांमध्‍ये 60 नविन विंधन विहीरी - श्रीमती जयश्री भोज


 
पाणी टंचाई       टंचाई कृती आराखड्यातील कामांना गती
  • विंधन विहीरीसाठी 41 लाख 67 हजार रुपये मंजूर
  • कारंजा व देवळी तालूक्‍यातील पाच गावात दोन टँकर
  • 51 खाजगी विहीरींचे अधिग्रहण
वर्धा,दि.6-ग्रामीण पाणी टंचाई आराखड्यातील प्रस्‍तावित उपाययोजना तातडीने पूर्ण करण्‍यात येणार असून 49 गावामध्‍ये 60 नविन विंधन विहीरीसाठी 41 लाख 67 हजार रुपये मंजूर करण्‍यात आले असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी आज दिली.
  
वर्धा जिल्‍हा पाणी टंचाई निवारणार्थ 3 कोटी 13 लाख 44 हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार करण्‍यात आला असून पाणी टंचाई झालेल्‍या गावामध्‍ये 303 उपाययोजना पूर्ण करण्‍यात येणार आहेत.
            पाणी टंचाई निवारणार्थ 60 नवीन विंधन विहीरी मंजूर करण्‍यात आल्‍या असून, 42 विंधन विहीरीचे कामे सुरु आहेत. पूर्ण झालेल्‍या  विंधन विहीरीवर तात्‍काळ  यावर हातपंप बसवून पिण्‍याचे पाणी उपलबध करुन देण्‍यात येत असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी आज दिली. मंजूर करण्‍यात आलेलया नविन विंधन विहीरीमध्‍ये वर्धा तालुकयातील आठ, सेलू चार, देवळी अकरा, आर्वी पंधरा, कारंजा पाच , हिंघनघाट चार आणि समुद्रपूर तालुक्‍यातील तेरा विंधन विहीरीचा समावेश आहे.
                          पाच गावात दोन टँकर
            पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई असलेल्‍या कारंजा व देवळी तालुक्‍यातील पाच गावात दोन टँकर व्‍दारे पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यात येत आहे. टँकरव्‍दारे पाणीपुरवठा करण्‍यात येणा-या गावांमध्‍ये कारंजा तालुक्‍यातील बोटाना, मोरगाव ढोले, देवळी तालुक्‍यातील लक्ष्‍मीनारायणपूर, चिटकी व शेकापूर झोपडी या गावाचा समावेश आहे.
             पाणी टंचाई निवारणासाठी जिल्‍ह्यात 51 खाजगी विहीरीचे अधिग्रहण करण्‍यात आले असून, 95 पाणी पुरवठा नळ योजनांची विशेष  दुरुस्‍ती करण्‍यात येत असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
                        4 हजार 270 विंधन विहीरी
             जिल्‍ह्यात 49 हजार 270 विंधन विहीरी असून याव्‍दारे ग्रामीण भागात पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पुरवठा करण्‍यात  येत  असून, विंधन विहीरीवर हातपंप, दुहेरी पंप तसेच विद्युत पंप बसविण्‍यात आले आहेत. 431 हातपंप आठमाही तर 3 हजार 441 बारमाही हातपंपाव्‍दारे पाणी उपलबध करुन देण्‍यात येत आहेत.विंधन विहीरीवर हातपंपासोबत 30 दूहेरी पंप बसविण्‍यताआले असून 132 विद्युत पंप सुरु आहेत.
            पाणी टंचाई निवारणासाठी कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍यात  आला असून, प्रत्‍येक गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करण्‍याच्‍या सूचना  दिल्‍या असल्‍याची माहितीही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.

No comments:

Post a Comment