Friday 8 June 2012

उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्‍या - अजित कोर्डे


                           
                   जिल्‍ह्यातील गुणवंत विद्यार्थ्‍यांचा    गौरव
            वर्धा, दि.8 – विद्यार्थ्‍यांना  शैक्षणिक गुणवत्‍ता वाढविण्‍यासाठी तसेच उच्‍च शिक्षणासाठी समाजातील गरीब व होत करु विद्यार्थ्‍यांनी बँकांच्‍या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्‍यवस्‍थापक अजित कोर्डे यांनी केले.
            बाराबी परिक्षेत 90 पेक्षा जास्‍त गुण मिळवून प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा गौरव जिल्‍ह्याची अग्रणी बँक बँक आफफ इंडिया तर्फे न्‍यू आटर्स कॉलेज येथे आयोजित करण्‍यात आला होता. त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. कोर्डे बोलत होते.
     अध्‍यक्षस्‍थानी माहिला विकास संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. राजेश भोयर होते.  तर प्रमुख पाहूणे म्‍हणून जिल्‍हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे, बँकेचे वयवसाय विकास अधिकारी एस.एम. शास्‍त्री, मुख्‍य प्रबंधक नितीश नायक, जिल्‍हा प्रबंधक मोहन मशानकर  उपस्थित होते.
      बँकेचे केवळ कर्ज देणे व जमा राशी स्विकारणे एवढेच कार्य नसून सोबतच सामाजिक बांधिलकी समजून गुणवंत विद्यार्थ्‍याना त्‍यांची शैक्षणिक गुणवत्‍ता वाढविण्‍याकरीता तसेच त्‍यांच्‍या मदतीकरीता बँक सदैव तत्‍पर असल्‍याचे यावेळी अजित कोर्डे यांनी  सांगितले. शेतक-यांच्‍या मुलांना उचच शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी बँकेतर्फे पुढाकार घेण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी यावेळी दिली.
     माणूस सर्व प्राण्‍यात श्रेष्‍ठ आहे . किती जगतो, किती संपत्‍ती मिळवितो  त्‍यापेक्षा ज्ञान  मिळवून किती लोकांचे कल्‍यान करतो , ही भावना विद्यार्थ्‍यांनी  घेऊन पुढील आयुष्‍य पूर्ण करावे असे विचार जिल्‍हा कृषि अधिक्षक ब-हाटे यांनी व्‍यक्‍त  केले.
            न्‍यू आर्ट कॉमर्स अॅनड सायन्‍स कॉलेज परिसरात वृक्षारोपन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. गुणवंत विद्यार्थ्‍यांना फळ वृक्षरोपण, स्‍मृति चिन्‍ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्‍यात आला.
            अध्‍यक्षीय  भाषणात डॉ. राजेश भोयर यांनी विद्यार्थ्‍यानी  कठोर परिश्रम घेवून ज्ञान संपादन करावे तसेच ज्‍या क्षेत्रात नोकरीच्‍या संधी अधिक आहेत असे क्षेत्र निवडावे असे आवाहन विद्यार्थ्‍यांना केले.
               जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे यांचेही यावेळी भाषण झाले.
              न्‍यू इंग्लिश ज्‍यू. कॉलेजचे 11, जानकीदेवी बजाज सायन्‍स कॉलेजचे 11, कमला नेहरु ज्‍यूनिअर कॉलेज ,  गांधीग्राम कनिष्‍ठ महा., न्‍यू आर्टस अॅण्‍ड कॉमर्स महा., आनंदराव मेघे कनिष्‍ठ महा. प्रतयेकी एक , जवाहर नवोदय विद्यालय 4, लायड विद्यालय 6 अशा एकूण 39 विद्यार्थ्‍यांचा गुण गौरव करण्‍यात आला.
      कार्यक्रमाचे संचलन मुरलीधर बेलखोडे यांनी केले तर बा.दे हांडे यांनी राष्‍ट्र वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ.डी.के.अग्रवाल ग्रामीण प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी काळे, संजय इंगळे तिगावकर, ओंकार धावडे, बागदरकर, डॉ.बोबडे आदि मान्‍यव प्रमुख्‍याने उपस्थित होते.                                                                                                   00000

No comments:

Post a Comment