Wednesday 6 July 2011

कृषीभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे यांचा जिल्हाधिका-यांचे हस्ते सत्कार



          महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.305         जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------
             कृषीभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे
                 यांचा जिल्हाधिका-यांचे हस्ते सत्कार
वर्धा,दि.6- महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये ऊल्लेखनीय व भरीव अशी कामगीरी केली असून कृषि विकासात मोलाचा वाटा आहे असे पवनार येथील कृषिभुषण पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे यांचा जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पुष्पगुच्छ देवून सन्मानित  केले.
      यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनिल राऊत, मुख्य कार्यपालन अधिकारी लिना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा कृषि अधिक्षक बि.एस.बराते, सोहम पंड्या, अनिल मेघे आदि मान्यवर उपस्थित होते.
      1 जुलै 2011 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती क्रिडा संकुल पुणे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषिभूषण डॉ. नंदकिशोर तोटे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
      2006 चा कृषिभूषण व 1994 चा शेतीनिष्ठ हे महाराष्ट्र शासनाचे कृषि पुरस्कार प्राप्त डॉ. नंदकिशोर तोटे ह्यांनी पारंपरागत शेतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे प्रयोग त्यांनी आपल्या शेतीतून महाराष्ट्र व विदर्भाच्‍या शेतक-यांपर्यंत पोहचविले आहे. प्रगत शेती करण्याकरीता युरोप राष्ट्राचा विदेश दौराही त्यांनी केलेला आहे. ते शेतीनिष्ठ व प्रयोगशिल शेतकरी आहेत.
      शेतकरी सुखी व्हावा त्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला कसा मिळविता येईल त्याकरीता शेतीच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयोग ह्यांचे मार्गदर्शन टि.व्ही., वर्तमान पत्र व कृषि विभागाच्या मार्गदर्शन शिबिरातून ते नेहमी करीत असतात. व शेतीवर भेट देणा-या शेतक-यांना योग्य माहिती देऊन त्यांचे समाधान करतात.
                          00000

No comments:

Post a Comment