Friday 26 August 2011

परिक्षा केंद्रावर 144 कलम लागू


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.26 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––-----------
               
     वर्धा, दि. 26- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक पदासाठी  या राज्येसेवा पूर्व परिक्षा दिनांक 28 ऑगस्ट 2011 रोजी वर्धा येथील जी.एस.कॉमर्स कॉलेज, यशवंत महाविद्यालय, जानकी देवी बजाज सायन्स कॉलेज व सुशील हिंमतसिंघका महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
     या परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्या यासाठी जिल्हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्त अधिकारान्वये परिक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आली आहे.
     या कलमाचा अंमल दि. 28 ऑगस्ट 2011 पर्यंत राहणार असून, सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात 2 अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि सदर परिक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात सर्व झेरॉक्स, मोबाईल, एसटीडी, आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट सेवा इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स आदी सुविधा व उपकरणाचे वापरावर व सदर बाबतची केंद्रे सुरु राहण्यावर निर्बंध व प्रतिबंध करण्यात आले आहे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.                                                             00000


No comments:

Post a Comment