Wednesday 24 August 2011

२ ऑक्टोबरपासून राज्यात दोन टप्प्यात सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना

बुधवार, २४ ऑगस्ट, २०११
सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना राज्यात २ ऑक्टोबर ते डिसेंबर २०११ पर्यंत २ टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. प्रत्येक टप्पा ४५ दिवसांचा राहील. 

केंद्र शासनाने २०११ मध्ये सामाजिक-आर्थिक व जातनिहाय जनगणना करण्याचे ठरविले आहे. भारत सरकारच्या वित्तीय आणि तांत्रिक सहाय्याने ही जनगणना करण्यात येईल. ग्रामीण आणि शहरी भागात प्रथमच एकाच वेळी सुरु करण्यात येणाऱ्या जनगणनेचे Enumeration Block (EB) निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सुमारे २.२४ लक्ष Enumeration Blocks (EB) तसेच एक प्रगणक (Enumerator) ४ EB चे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी सुमारे ६२ हजार प्रगणकांची आवश्यकता भासणार आहे. ६ प्रगणकांवर १ पर्यवेक्षक (Supervisor) असेल, त्यासाठी सुमारे ११ हजार पर्यवेक्षकांची आवश्यकता भासेल. या कामासाठी प्रगणक / पर्यवेक्षक, तलाठी, ग्राम सेवक, कृषी सहाय्यक इ. जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांमधून निवडण्यात येतील. Paperless सर्वेक्षण, माहिती प्रथमच Hand Head Devise वर भरण्यात येतील. त्यासाठी Tablet P.C. व Data Entry Operator Bharat Electronics Limited (BEL) मार्फत पुरविण्यात येणार आहेत. प्रगणक / पर्यवेक्षक यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देण्यात येईल.

राज्यातील कामाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तर उप विभाग (Sub Division) स्तरावर उप विभागीय अधिकारी, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.

Hand Head Devise वर भरलेली माहिती रोज तालुक्याच्या Server वर up load करण्यात येणार असून ती केंद्र शासनाच्या महासंगणकाशी जोडण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री / पालक सचिव या कामावर देखरेख करतील

No comments:

Post a Comment