Monday 22 August 2011

2010-11 चे तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कार घोषित सकाळचे प्रकाश कथले यांना प्रथम तर अनिल मेघे व्दितीय व होनाडेंना तृतीय पुरस्कार


                       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक *        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.22 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------
प्रवीण होनाडे                                   अनिल मेघे                              प्रकाश कथले
       वर्धा,दि.22- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम 2010-11 च्या पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रकाश कथले यांना, व्दितीय पुरस्कार दैनिक प्रतापगडचे वारे चे संपादक अनिल मेघे यांना तर तृतीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रवीण होनाडे यांना जाहिर झाला आहे.
सामाजिक शांतता आणि सुरक्षितता यात वृत्तपत्रे सकारात्मक विचार ठेवून समाजमत बनवू शकतात यात चांगल्या पध्दतीने लिखाण करणा-या पत्रकारांना पुरस्कार देण्याची ही योजना आहे.
या पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्यातून पाच प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. पुरस्कार परीक्षण समितीने केलेल्या गुणांकनानुसार दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रकाश कथले यांना प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. 25000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दुसरा पुरस्कार येथील दैनिक प्रतापगडचे वारे चे संपादक अनिल मेघे यांना तर तृतीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी प्रवीण होनाडे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम रुपये 15 हजार व प्रमाणपत्र आणि रोख रक्कम रुपये 10 हजार व प्रमाणपत्र अनुक्रमे असे हे पुरस्कार आहेत.
पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे जिल्हाधिकारी जयश्री भोज तसेच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी अभिनंदन केले आहे.
                  000000

No comments:

Post a Comment