Monday 22 August 2011

14 ग्रामपंचायतीत रिक्त पदांसाठी 21 सप्टेंबर रोजी निवडणूक


       महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक *       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.22 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.22-ग्रामपंचायतींचा रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार वर्धा जिल्ह्यात 14 ग्रामपंचायतींसाठी 21 सप्टेंबर 2011 रोजी पोट निवडणूक होईल.
     वर्धा तालुक्यातील इंझापूर आणि चिकणी, सेलू तालुक्यातील बोंडसुला, देवळी तालुक्यातील पळसगाव, टाकळी (दरणे) आणि लक्ष्मीनारायणपूर, आष्टी तालुक्यातील खडका आणि ममदापूर, हिंगणघाट तालुक्यातील सिरुड, समुद्रपूर तालुक्यातील फरिदपूर, आसोला, पारडी, उमरी आणि मोहगाव या 14 ग्रामपंचायती मधील रिक्त पदांसाठी ही निवडणूक आहे.
     या ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
                           0000

No comments:

Post a Comment