Friday 13 April 2012

रविवारी पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम



       वर्धा, दि. 13-  पोलीओ निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत राज्‍यात 1995 पासून पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्‍यात येत आहे. पल्‍स पोलीओ लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी दिनांक 15 एप्रिल 2012 रोजी  राबवायची आहे.
       जिल्‍ह्यात 1296 लसीकरण केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन यामध्‍ये ग्रामीण भागात 1114 , शहरी क्षेत्रात 182 केंद्रे आहेत. या मोहीमेत एकूण 3163 कर्मचारी व 260 पर्यवेक्षक व अधिकारी कार्यरत राहणार आहेत. यावर्षी ग्रामीण भागातील 86687 लाभार्थींना शहरी क्षेत्रात 30454 असे एकूण 117141 लाभार्थींना पेालीओचा डोज पाजण्‍यात येणार आहे. याशिवाय टोल नाके, फिरती पथके, ट्रान्‍झीट टिम्‍स, पर्यवेक्षकिय पथके, वाहन व्‍यवस्‍था पुरेशा प्रमाणात करण्‍यात आलेली आहे.

             दि. 15 एप्रिल 2012 च्‍या सत्रात आपल्‍याकडील व परिसरातील 5 वर्षाचे आंतील बालकांना  पोलीओ लसीकरण केंद्रांवर नेऊन लस पाजून घ्‍यावी आणि मोहिम यशस्‍वी करावी. स्‍थानिक लोकप्रतिनिधीनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील  5 वर्षाचे आंतील  एकही बालक पोलीओ डोजपासून वंचित राहणार नाही याबाबत सतर्क राहुन पल्‍स  पोलीओ लसीकरण मोहीम यशस्‍वी करावी. असे आवाहन जिल्‍हा पल्‍स पोलिओ लसीकरण समन्‍वय  समीतीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.के.झोड.राठोड  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment