Tuesday 10 April 2012

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाअंतर्गत जि.प. अध्‍यक्षाचे हस्‍ते धनादेशाचे वाटप


          वर्धा, दि. 11- राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियान सन 2011-12 अंतर्गत हरितगृह उभारणी करणे या घटकात वर्धा उपविभागात 4 हरितगृह कार्यान्वित करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये अजय महादेवराव डेकाटे  रा. हिंगणी ता. सेलु, यांचेकडे  1.67 हेक्‍टर शेती असून,त्‍यांचेकडे संत्रा व मोसंबी, फळपिकाची व गुलाब 0.50 हेक्‍टर या फळपिकाची लागवड झालेली  आहे. तसेच त्‍यांनी हार्टिकल्‍चर ट्रेनिंग सेंटर, तळेगांव (दाभाडे) ता. मावळ जि. पुणे येथे हरित गृहातील शेती बाबत पाच दिवस प्रशिक्षण घेऊन  प्रशिक्षणातून  प्रवृत्‍त होऊन त्‍यांनी शेतात 1000 चौ.मी. आकाराचे पॉली हाऊस व 2000 चौ. मि. आकाराचे शेडनेट हाऊसची उभारणी केलेली आहे. शेडनेट हाऊस मध्‍ये दोडके व पॉलीहाऊस मध्‍ये कोथिंबीर ही पिके घेतलेली आहे. त्‍यांचेकडे पॅक हाऊस 600 चौ. फुट आकाराचे बांधकाम झालेले आहे. मीनी  ट्रॅक्‍टर 18 एच पी  व नर्सरी (वनराई) कार्यान्वित आहे.
       डेकाटे यांना पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस व पॅक हाऊस उभारणी करीता बँक ऑफ इंडिया, हिंगणी शाखा ता. सेलु यांनी 20 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले आहे. राष्‍ट्रीय  फलोत्‍पादन अभियानातंर्गत कृषि विभागाकडून 3,52,800 रुपयाचे धनादेश  जि.प. चे अध्‍यक्ष नानाभाऊ ढगे यांचे हस्‍ते  प्रदान करण्‍यात आले.
         यावेळी जिल्‍हा कृषि अधिक्षक  संतोष डाबरे, उपविभागीय कृषि अधिकारी, वर्धा, आर्वी, हिंगणघाट उपस्थित होते.
                                                            00000000

No comments:

Post a Comment