Thursday 2 February 2012

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकीसाठी प्रशासन सज्‍ज - जिल्‍हाधिकारी


    वर्धा, दि.2- जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातलेल्‍या असून, या निवडणूकांसाठी जिल्‍हा प्रशासन सज्‍ज झाले असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली आहे.
     वर्धा जिल्‍ह्यासाठी जिल्‍हा परिषदेकरीता 51 सदस्‍य निवडून द्यावयाचे असून,  8 पंचायत समितीसाठी 102 सदस्‍य निवडून द्यावयाचे आहे. जिल्‍हा परिषद व पंचायत समिती करीता गट व गण निहाय प्रभाग रचनेचे नकाशे तयार करुन संकेतस्‍थळावर टाकण्‍यात आले आहे. प्रारुप मतदार यादी गट व गननिहाय आक्षेपानंतर दिनांक 17 जानेवारी 2012 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे.
     जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या निवडणूकीत 7 लक्ष 23 हजार 592 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार असून, त्‍यामध्‍ये 3 लक्ष 80 हजार 098 पुरुष व  3 लक्ष 43 हजार 494 स्त्रियांचा समावेश आहे. निवडणूकीसाठी वापरण्‍यात येणा-या मतदान केंद्राची संख्‍या 1 हजार 186 एवढी आहे.
    जिल्‍हा परिषदेमध्‍ये निवडून द्यावयाच्‍या 51 सदस्‍य संख्‍येत आष्‍टी 4, कारंजा 5, आर्वी,सेलू, समुद्रपूर व देवळी येथून प्रत्‍येकी 6 , वर्धा येथून 11 व हिंगणघाट येथून 7 सदस्‍य असतील. तर पंचायत समितीमध्‍ये 102 सदस्‍य निवडून द्यावयाचे असून, त्‍यामध्‍ये आष्‍टी येथून 8, कारंजा 10, आर्वी, सेलू, समुद्रपूर, देवळी येथून प्रत्‍येकी 12 , वर्धा येथून 22 व हिंगणघाट येथून 14 सदस्‍यांचा समावेश आहे.
     आष्‍टी तालुक्‍यातील मतदारांची एकूण संख्‍या 58,524 असून, त्‍यामध्‍ये     30 हजार263 पुरुष व 28 हजार 261 स्त्रियांचा समावेश आहे. यासाठी 97 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. कारंजा तालुक्‍यातील मतदारांची एकूण संख्‍या 66 हजार 791 असून त्‍यामध्‍ये 34 हजार 378 पुरुष  व 32 हजार 413 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यामध्‍ये 119 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. आर्वी तालुक्‍यात  एकूण मतदारांची संख्‍या 77 हजार 732 असून त्‍यामध्‍ये 40 हजार 622 पुरुष व 37 हजार 110 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 126 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. सेलू तालुक्‍यात 86 हजार 786 मतदार असून, यामध्‍ये 45 हजार 573 पुरुष व 41 हजार 213 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. वर्धा तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या 1 लक्ष 72 हजार 863 असून, त्‍यामध्‍ये 91 हजार 174 पुरुष व 81 हजार 688 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. समुद्रपूर तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या 88 हजार 190 असून त्‍यामध्‍ये 46 हजार 634 पुरुष 41 हजार 556 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 146 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे. देवळी तालुक्‍यात एकूण मतदारांची संख्‍या  81 हजार 551 असून, त्‍यामध्‍ये 43 हजार 173 पुरुष व 38 हजार 378 स्त्रि मतदाराचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्‍यात 91 हजार 156 मतदारांची संख्‍या असून त्‍यामध्‍ये 48 हजार 281 पुरुष व 42 हजार 875 स्त्रि मतदारांचा समावेश आहे. यासाठी 154 मतदान केंद्र उघडण्‍यात येणार आहे.
     जिल्‍ह्यात संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्र तालुका निहाय दिलेले असून, संवेदनशिल मतदान केंद्र कंसाबाहेर दर्शविण्‍यात आले आहे. आष्‍टी  4(3) , कारंजा 16, आर्वी 26, सेलू 49, वर्धा 46, समुद्रपूर 62(15), देवळी 7 व हिंगणघाट येथे 30 मतदान केंद्र असतील.
     जिल्‍ह्यात मतदान शांतपणे व निर्भय वातावरणात होण्‍यासाठी पुरेशी खबरदारी घेण्‍यात आलेली आहे. कायदा व सुवस्‍था लक्षात घेता मतदान केंद्रावर पेट्रोलींग व स्‍ट्रायकिंग फोर्स करीता चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 12 पोलीस निरीक्षक, 40 उपपोलीस निरिक्षक आणि 1380 पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्‍त  ठेवण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूकीच्‍या कामासाठी बाहेरुन आवश्‍यक मणूष्‍यबळ लागणार असून, त्‍यामध्‍ये एक अप्‍पर पोलीस अधिक्षक, दोन उप विभागीय पोलीस अधिकारी, प्रत्‍येकी 5 पोलीस निरीक्षक व 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 350 पेालीस , 50 महिला पेालीस कर्मचारी, 800 पुरुष गृहरक्षक, 100 महिला गृहरक्षक, राज्‍य  राखीव पोलीसाची एक कंपनी व 60 वनरक्षक कर्मचारी व अधिकारी वर्ग  निवडणूकीच्‍या कामासाठी उपलब्‍ध  होणार आहेत.
     जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यांमध्‍ये आठ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्‍यात आलेले आहेत. तालुक्‍यातील गणाप्रमाणे 102 क्षेत्रीय अधिकारी व 15 राखीव क्षेत्रीय अधिकारी निवडणूकीसाठी उपलब्‍ध असतील तसेच 3 हजार 558 मतदान अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे.
     या निवडणूकीच्‍या कामासाठी 192 जीप/कार लागणार आहे. मतदानासाठी पथक पोहचविण्‍यासाठी 95 बसेसची व्‍यवस्‍था राज्‍य परिवहन महामंडळाकडून करण्‍यात आली आहे.
     जिल्‍ह्यात निवडणूक मतदान यंत्रणेसाठी 1500 बॅलेट युनीट व 1500 कंट्रोल युनिटची गरज भासेल मात्र उमेदवारांची संख्‍या अधिक असल्‍यास अतिरीक्‍त बॅलेट युनिटची मागणी करण्‍यात येईल. भारत निवडणूक आयोगाकडील निवडणूक मतदान यंत्र वापरल्‍यास प्रत्‍येकी 2900 कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची मागणी करण्‍यात येईल.
     निवडणूकीसाठी सर्व तहसिलमध्‍ये हेल्‍पलाईन व नियंत्रण कक्ष उघडण्‍यात आले आहे.
     सदर निवडणूकीमध्‍ये अधिकाधिक मतदान होण्‍यासाठी जनजागृती अभियान राबविण्‍यात येत असून, मतदान दिवस साजरा करण्‍यात आलेला आहे अशी माहिती नमुद करण्‍यात आली आहे.
                             000000  

No comments:

Post a Comment