Wednesday 1 February 2012

क्रीडा नैपुण्‍य चाचणीचे आयोजन 7 फेब्रुवारी रोजी


      वर्धा,दि.1- शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सुरु असलेल्‍या विविध क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याव्‍दारे प्रवेश देण्‍यात येतो. महाराष्‍ट्रात शारिरीक शिक्षण व क्रीडा क्षेत्राच्‍या दर्जा उंचावण्‍यासाठी आणि राज्‍यातुन जास्‍तीत जास्‍त आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे खेळाडु तयार होण्‍यासाठी वैज्ञानिक पध्‍दती, अध्‍यावत उपकरणे आणि प्रशिक्षण यावर अधिकाधिक प्रमाणात भर देण्‍याची गरज आहे. या उद्देशानं राज्‍यातील खेळ परंपरा अंतःसामर्थ्‍य व खेळ सुविधा लक्षात घेवुन राज्‍यात पुणे येथे शिवछत्रपती क्रीडा पीठाची स्‍थापना केलेली आहे.
     बॅटरी ऑफ टेस्‍टव्‍दारे निवड क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍या शाळा स्‍तरावरुन तालुकास्‍तर, जिल्‍हास्‍तर आणि राज्‍यस्‍तरीय चाचण्‍याचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या करीता दि. 7 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा क्रीडा संकुल, वर्धा येथे जिल्‍हास्‍तरीय क्रीडा नैपुण्‍य चाचणीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
    वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक तालुका क्रीडा संयोजक यांनी ज्‍या खेळाडुंना शाळास्‍तरावर चाचणीत 8 गुण प्राप्‍त  आहेत अशा खेळाडुंनी इलीजीबिलीटी फॉर्म सह उपस्थित राहावे, असे जिल्‍हा क्रिडा अधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.     

No comments:

Post a Comment