Wednesday 1 February 2012

सानेवाडी येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.1-राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयाच्‍या जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ.आर.डी.रावखंडे यांच्‍या मार्गदर्शनामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयातील  नागरी आरोग्‍य  केंद्र क्र. 1 सानेवाडी अंतर्गत अंगणवाडी क्र. 18 गोटे ले आऊट, वर्धा येथे (दि. 24 जानेवारी 2012 ला) नुकताच समतोल पोषक आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेविका योगिता बागडे, बालविकास अधिकारी माहुर्ले, माजी नगरसेवक निलेश खोंड , वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्‍पा वानखडे, अंगणवाडी सेवीका नम्रता वानखेडे तसेच परिसरातील महिला व माता उपस्थित होत्‍या.
     यावेळी उपस्थित पाहुण्‍यांनी मनोगत व्‍यक्‍त करताना सांगितले की पोषण आहाराविषयीचे महत्‍व प्रतयेक मातेने जाणून घेवून आहार धेतांना ज्‍यामध्‍ये जास्‍तीत जास्‍त पोषक घटक असतील असा आहार सेवन केला पाहिजे. म्‍हणजे जन्‍माला येणारे बाळ सुदृढ राहिल. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषक आहाराची आवश्‍यकता आहे तो आहार वेळेत मिळाला नाही तर मुल कुपोषणाकडे वळतात. त्‍यामुळे बालकाचा मानसिक, शारीरिक व बौध्‍दीक वाढ योग्‍य प्रमाणात होत नाही. म्‍हणूनच बालकांच्‍या वाढीकरीता आहार देताना स्‍वच्‍छ व पेाषक आहार द्यायला पाहिजे. शासकिय स्‍तरावर गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजना राबविल्‍या जातात त्‍यांचा योग्‍य प्रकारे लाभ घेतला पाहिजे. तसेच 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आरोग्‍य सुदृढ राहण्‍याकरीता पोषण आहाराचे महत्‍व, पोषण आहारामध्‍ये काय पदार्थ व किती प्रमाणात घ्‍यायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्‍यात आले.
     कार्यक्रमाचे संचालन अर्चना भुरे तर आभार प्रदर्शन डॉ. शिल्‍पा वानखेडे यांनी केले. यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्‍या.

No comments:

Post a Comment