Thursday 2 February 2012

वाहन धारकाच्‍या सोयीसाठी तालुका निहाय शिबीर


       वर्धा,दि.2- मोटार वाहन धारकांच्‍या सोयीसाठी जिल्‍ह्यातील हिंगणघाट,आर्वी, पुलगांव व कारंजा येथे तालुकानिहाय शिबीरोच नियेाजन करण्‍यात आले असून, शिबीराची तारीख व महिना खालील प्रमाणे असून, शिबीराच्‍या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालया संबधित कामे केल्‍या जातील. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी दिली आहे.
      हिंगणघाट या तालुक्‍याच्‍या ठिकाणी जानेवारी महिन्‍यात दि. 10 व 20 , फेब्रुवारी महिण्‍यात दि. 10 व 21 , मार्च महिण्‍यात 9 व 20 , एप्रिल महिण्‍यांत दि. 10 व 20, मे महिण्‍यांत दि. 10 व 21 , जून महिण्‍यात दि. 11 व 20,  जूलै महिण्‍यांत दि. 10 व 20 , ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 10 व 21 , सप्‍टेंबर  महिण्‍यात दि. 10 व 20 ,ऑक्‍टोंबर महिण्‍यात दि. 10 व 20 नोव्‍हेंबर महिण्‍यात 9 व 20 व डिसेंबर महिण्‍यात दि. 10 व 20 या तारखाच्‍या दिवसाला भरविण्‍यात येतील. आर्वी तालुक्‍यातील महिण्‍यानुसार जानेवारीमधे दि. 19 , फेब्रुवारीत दि. 18 रोजी,  मार्च , एप्रिल, मे,जून, जुलै, ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर च्‍या प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 19 तारखेला ऑगस्‍ट महिण्‍यात दि. 17 व सप्‍टेंबर महिण्‍यात दिनांक 18 ला शिबीराचे आयेाजन होईल. पुलगाव येथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एप्रिल, जुलै, ऑगस्‍ट, सप्‍टेंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर महिण्‍याच्‍या प्रत्‍येकी 27 तारखेला, मे व जून महिण्‍याच्‍या 28 तारखांना व  ऑक्‍टोंबर मधे 25 तारखेला शिबीर आयोजित करण्‍यात येईल.कारंजा तालुक्‍यात जानेवारी व एप्रिल, जुलै महिण्‍याच्‍या प्रत्‍येक 30 तारखांना,मार्च महिण्‍यांच्‍या 29 तारखांना जून, ऑगस्‍ट,सप्‍टेंबर,ऑक्‍टोंबर, नोव्‍हेंबर व डिसेंबर मधे प्रत्‍येक महिण्‍याच्‍या 29 तारखेला शिबीराचे आयोजन होईल.
     याठिकाणी सर्व प्रकारचे शिकाऊ / पक्‍की अनुज्ञप्‍ती दिल्‍या जाईल.सर्व प्रकारचे वाहन चालविण्‍याची चाचणी होईल. सर्व प्रकारचे पक्‍के, अनुज्ञप्‍ती / नुतणीकरण स्‍मार्ट कार्ड देण्‍यात येतील. वाहन (कन्‍डक्‍टर) अनुज्ञप्‍ती देणे व त्‍यांचे नुतणीकरण करणे, नविन वाहन नोंदणी बाहेर प्रांतातून येणा-या वाहनाचे बाबतीत फेर नोंदणी केल्‍या जाणार नाही. मोटार वाहन कर स्विकारल्‍या जाईल.रिक्षा,टॅक्‍सी तसेच शेती कामासाठी वापरली जाणारी ट्रॅक्‍टर व ट्रेलर या संवर्गातील वाहनाची नियतकालीन यांत्रिक तपासणी दौ-याच्‍या ठिकाणी करण्‍यात येईल. शिबीरात तालुक्‍यातील कामे करण्‍यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कळवितात.

No comments:

Post a Comment