Friday 3 February 2012

पुलफैल येथे पोषण आहार कार्यक्रम


     वर्धा,दि.2-राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान नागरी प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत नागरी भागातील मागास व झोपडपट्टी परिसरातील लोकांचे आरोग्‍यमान उंचावण्‍यासाठी नगर पालिका क्षेत्रामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयाचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. रत्‍ना रावखंडे यांच्‍या मार्गदर्शनामध्‍ये नागरी आरोग्‍य केंद्र क्र. 2 पुलफैल वर्धा येथे नुकतेच (20 जानेवारी 2012) पोषण आहार कार्यक्रम घेण्‍यात आला.
     कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मुख्‍याध्‍यापिका शोभा सेलकर तसेच प्रमुख अतिथी नगरसेविका रिना सहारे,वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्‍वला कांबळे,अंगणवाडी पर्यवेक्षीका किन्‍हेकर व परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
     यावेळी बोलताना उपस्थित मान्‍यवर मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, आहारविषयी प्रत्‍येक मातेने घ्‍यावयाची काळजी, पोषक आहाराचे महत्‍व व फायदे, गरोदर माता व बालक यांच्‍याकरीता असलेल्‍या विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजना तसेच 0 ते 5 वयोगटातील मुलांचे आरोग्‍य सुदृढ राहण्‍याकरीता पोषण आहाराचे महत्‍व, समाजावून सांगीतले. मुलांच्‍या वाढीसाठी ज्‍या पोषण आहाराची आवश्‍यकता आहे ते योग्‍य वेळेत मिळाले नाही तर मुलं कुपोषणाकडे वळतात. त्‍याकरीता पोषण आहारामध्‍ये काय पदार्थ व किती प्रमाणात घ्‍यायला पाहिजे असेही त्‍यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे संचालन अंजली थुल तर आभार प्रदर्शन डॉ.उज्‍वला कांबळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्‍येने परिसरातील माता उपस्थित होत्‍या.
                        000000

No comments:

Post a Comment