Wednesday 20 July 2011

पालकमंत्र्याकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता

          महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी  पत्रक                जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.20 जूलै  2011
-------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.20-वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी सेलू तालुक्यातील देऊळगांव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त विठ्ठल कोठेकर यांच्या कुटूंबाची भेट घेवून त्यांचे सात्वंन केले. त्याप्रसंगी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण खर्च आपण उचलणार अशी ग्वाही दिली होती, त्यानुसार पालकमंत्र्यानी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
          वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर पालकमंत्री दिनांक 16 जुलै रोजी आले असता त्यांनी देऊळगांव येथील आत्महत्याग्रस्त  शेतकरी कोठेकर कुटूंबियाची भेट घेवून सांत्वना केली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी रेखा कोठेकर यांनी मंत्रीमहोदयासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तुटपुंज्या रकमेत संसाराचा गाळा सांभाळणे फार कठीण झाले असून, 11 व्या वर्गात शिकत असलेली प्रतिभा कोठेकर या मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार सहन होण्या पलिकडे आहे.
          त्यावर मंत्रीमहोदय मुळक म्हणाले की, मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार मी उचलणार असून, मुलीच्या शिक्षणात कितीही गतीरोध आले तरी शिक्षणात खंड पडता कामा नये. या त्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी काल शाळेचा गणवेश,वह्या व पुस्तके, संपूर्ण वर्षाचा देऊळगाव-वर्धा येण्या-जाण्याचा एस.टी.पास, शाळेचे शुल्क सुध्दा मंत्रीमहोदयांच्या वतीने भरण्यात आले आहे. प्रतिभा या मुलीच्या प्रगतीसाठी केलेले कार्य दिर्घ काळापर्यंत स्मरणात राहील. अशी माहिती  त्यांचे स्विय सचिव यांनी  दिली आहे.
                                                            00000

No comments:

Post a Comment