महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.18 जूलै 2011
-------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.18-महाराष्ट्र विधानमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 19 जुलै 2011 व बुधवार दिनांक 20 जुलै 2011 रोजी विधान भवन मुंबई येथे आयोजिलेले सर्व कार्यक्रम बुधवार दिनांक 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला आहे.
सर्व विद्यमान व माजी विधानमंडळ सदस्य, दिवंगत सदस्यांच्या पत्नी/ पती , जिल्हापरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, नगरपरिषदेचे अध्यक्ष यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भा.ना.कांबळे, सह सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment