Monday 18 July 2011

राष्ट्रीयकृत बँकानी शेतक-यांना अधिकाधिक कर्ज उपलब्‍ध करुन द्यावेत - पालकमंत्री

     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                दि.17 जूलै  2011
--------------------------------------------------------------------
वर्धा,दि.17- जिल्‍हा सहकारी मध्‍यवर्ती बँकेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागात सेवा सहकारी संस्‍थेच्‍या मार्फत शेतक-यांना खरीप व रब्‍बी हंगामासाठी मोठया प्रमाणावर पत पुरवठा करीत असते. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या शेती पूरक व्‍यवसायासाठी स‍हकारी बँकेजवळ पुरेसा निधी उपलब्‍ध राहत नाही यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकांनी  पुढाकार घेवून शेतक-यांना खरीप व रब्‍बी हंगामासाठी अधिकाधिक कर्ज उपलब्‍ध करून देण्‍यात यावे. असे आवाहन वित्‍त व नियोजन तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी केले़.
येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात काल पिक परिस्‍थीती व कर्जपुरवठा संबधी आढावा बैठक घेण्‍यात आली त्‍याप्रंसगी पालकमंत्री बोलत होते.
      यावेळी आमदार दादाराव केचे, जि.प अध्‍यक्ष विजय जयस्‍वाल , जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जि.प उपाध्‍यक्ष सुनिल राऊत, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिना बन्‍सोड, कृषि अधिक्षक बि.एस.बराते, कृषि अधिकारी आर.आर.पराते, नाबार्डचे महाव्‍यवस्‍थापक स्‍नेहल बन्‍सोड तसेच बॅकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्‍ट्रामध्‍ये सहकरी सेवा सोसायटीच्‍या माध्‍यमातून 80 टक्‍के शेतक-यांना पत पुरवठा करण्‍यात येत असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन पालकमंत्री मुळक म्‍हणाले की, या पत पुरवठयाच्‍या तुलनेत 20 टक्‍के खत पुरवठा राष्‍ट्रीयकृत बँकेच्‍या माध्‍यमातून करण्‍यात येतो. याउलट इतर राज्‍यामध्‍ये 80 टक्‍के पत पुरवठा हा राष्‍ट्रीयकृत बँकामार्फत तर 20 टक्‍के पत पुरवठा हा सहकारी सेवासंस्‍थे मार्फत केला जातो. अधिकाधिक पत पुरवठा सेवा संस्‍थे मार्फत होत असल्‍यामुळे सहकारी बँकेजवळ     शेतक-यांच्‍या पुरक व्‍यवसायासाठी पुरेशी रक्‍कम शिल्‍लक राहत नाही. मंत्रालयास्‍तरावर मुख्‍यमंत्र्याच्या अध्‍यक्षतेखाली अर्थविष्‍यक आढावा बैठकीत या बाबत  विचार विनिमय करण्‍यात आला होता. त्‍यानूसार राष्‍ट्रीयकृत बँकेनी व्‍यापक दृष्‍टीकोन ठेवून शेतक-यांना अधिकाधिक पिक कर्ज उपलब्‍ध करून द्यावे, असे सुचविण्‍यात आले असल्‍याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. चालूवर्षात पिक कर्जासाठी जिल्‍हा‍स्‍तरावर 438 कोटी 57 लक्ष रुपयाचे उदिष्‍ट दिले होते त्‍यापैकी 13 जूलै 2011 पर्यंत 39 हजार 455 शेतकरी खाते धारकांना 215 कोटी 89 लक्ष रुपयाचे वित्‍त पुरवठा करण्‍यात आला असून त्‍यामध्‍ये सहकारी बँकेने  15 हजार 515 खाते धारकांना 64 कोटी 70 लक्ष रुपये व 23175 खाते धारकांना 144 कोटी 83 लक्ष रुपयाचे वाटप केले आहे. वैनगंगा बँकेत 765 शेतक-यांना       6 कोटी 36 लक्ष रुपयाचा पतपुरवठा केल्‍याचा समावेश आहे
 जिल्‍हयाचे वार्षिक पर्ज्‍यमान 1057 मी मी असून 14 जूलै 2011 पर्यंत गेल्‍या वर्षाच्‍या तूलनेत 64 टक्‍के पाऊस पडत असल्‍याचे सांगून पालकमंत्री मुळक म्‍हणाले की, सद्यातरी पिक परिस्‍थीती समाधान कारक असून, जिल्‍हयात खताचा बंपरस्‍टॉल असल्‍यामूळे खताची टंचाई नाही. काही दिवसापुर्वी पावसामुळे तसेच हमालाच्‍या काम न करण्‍याच्‍या आडमुठीमुळे खताच्‍या टंचाईला      शेतक-यांना सामोर जावे लागले होते. आता मात्र परिस्‍थीतत सुधाराणा झाली असल्‍याचे त्‍यांनी  स्‍पष्‍ट केले ज्‍या शेतक-यांच्‍या शेतामध्‍ये बियाणाची उगवण झाली नसल्‍यास त्‍यांनी कृषि विभाग समितीकडे तक्रार करुन योग्‍य मार्गदर्शन घेवून ग्राहक तक्रार मचांकडे दाद मागावी असेही म्‍हणाले. यावर्षीच्‍या खरीप हंगामाच्‍या नियोजनानुसार शेतात पेरणीचे कामे आटोपली असून, नियोजनाच्‍या तूलनेत सोयाबिन पिकाची 134 टक्‍के पेरणी व कापसाठी 87 टक्‍के पेरणी झालेली आहेत.
यावेळी बोलताना कृषि अधिकारी पराते म्‍हणाले की, कृषि विक्री नियंत्रणा अंतर्गत 894 कृषी केंद्राची तपासणी करण्‍यात आली असून, 166 कृषी केंद्राना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्‍यापैकी 98 केंद्रचालकाना सक्त ताकीद देण्‍यात आली असून, 101 केंद्राना विक्री बंदचे आदेश देण्‍यात आले, 19 केंद्राचा परवाना निलंबीत तर , 19 केद्राचे परवाने रद्द केले असून, 1 केंद्रावर  पोलीस कार्यवाही  करण्‍यात आली आहे असे सागण्‍यात आले.
या प्रसगी  कृषि विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                        0000
     

No comments:

Post a Comment