Tuesday 19 July 2011

प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रम

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.19 जूलै  2011
--------------------------------------------------------------------------------
        वर्धा, दि. 19- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई यांचे मार्फत मतदारांच्या तात्पुरत्या याद्यांच्या चार प्रती जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडे पाठविणेची तारीख 15 जूलै 2011 शुक्रवार असून, मतदार यादीच्या प्रती फलकावर प्रसिध्द करणेची तारीख  20 जुलै 2011 बुधवार आहे.
दावा किंवा आक्षेप लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडे दाखल करणेची शेवटची तारीख 1ऑगस्ट 2011 सोमवार असून, दाखल करणेत आलेले दावे किंवा आक्षेपाबाबत जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून निर्णय करण्याची शेवटची तारीख   11 ऑगस्ट 2011 गुरुवार आहे. मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्याची तारीख  26 ऑगस्ट 2011 शुक्रवार आहे. असे जिल्हाधिकारी ,मुंबई उपनगर जिल्हा कळवितात.
                                                00000

No comments:

Post a Comment