Friday 22 July 2011

अपंगाच्या स्वयं उद्योगासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित


  महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा       दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि. 22- सन 2011-12 या आर्थिक वर्षात वर्धा जिल्ह्यातील अंध, कर्णबधिर अस्थिविकलांग व्यक्तिंना स्वयं उद्योगासाठी राज्य शासनाचया बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रुपये 2 लाख रुपये  कर्ज देण्याच्या योजना कार्यान्वीत आहे.त्यासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित आहे.
     अपंगत्वाच्या  प्रकारात मोडणा-या अपंग व्यक्तीनी या कार्यालयातुन मंजुर रक्कमेच्या 20 टक्के सुट सवलतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 31 जुलै 2011 पर्यंत विनामुल्य वितरणासाठी उपलब्ध आहेत. हे अर्ज समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांचेकडे दि. 31 ऑगस्ट 2011 पर्यंत संपूर्ण कागदपत्रासह पूर्णत: भरुन पाठवावे . या योजनेच्या अटी व नियम पुढील प्रमाणे आहेत.
     अर्जदार पूर्ण अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थि विकलांग ज्यांचे अपंगत्वाची  40 टक्केवारी व त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे. अर्जदार वर्धा जिल्ह्यात 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा रहिवासी असावा.अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा  कमी नसावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखा पेक्षा जास्त नसावे. अर्जदारास बँकेने रुपये 1,50,000 मंजुर केले त्याच व्यक्तींना मंजुर रक्कमेच्या 20 टक्के सुट सवलतीची रक्कम बँकेकडे जमा केली जाईल. अर्ज मंजुर करणे वा नामंजुर करणे हे बँकेच्या अधिकारातील बाब आहे. अर्जदार वा त्याच्या कुटूंबातील व्यक्ती थकित अर्जदार नसावा. व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला असावा.
     उपरोक्त अटीची पुर्तता करणा-या अपंगानी मुदतीत अर्ज नेणे व मुदतीत सर्व कागदपत्रासह अर्ज या कार्यालयास जमा करावे. मुदतीत व परिपूर्ण अर्ज असणे अनिवार्य आहे. अपुर्ण व मुदतीनंतर अर्ज या कार्यालयास सादर केल्यास तो अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही. असे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा कळवितात.
                           00000

No comments:

Post a Comment