Monday 18 July 2011

प्रगतीपथवर असलेल्‍या धरण बांधकांमाना प्राध्‍यान्‍य क्रमाने निधी देणार - पालकमंत्री

     
     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.17 जूलै  2011
--------------------------------------------------------------------
          वर्धा,दि 17:-  राज्‍यातील ज्‍या नविन धरणाचे बांधकाम 80 ते 95 टक्‍के कामे पूर्ण झाली आहेत अशा धरणाचे बांधकाम पुर्ण झाल्‍यास त्‍या जिल्‍हयातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्‍याचे प्रगतीपथावर असलेल्‍या धरण बांधकामाना प्राधान्‍य क्रमाने शासन निधी उपलब्‍ध करून दिल्‍या  जाईल.  अशी ग्‍वाही वित्‍त नियोजन , जलसंपदा राज्‍यमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेद्र मुळक यांनी दिली
 जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात काल पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण व पारेषण , जिल्‍हयातील कायदा व सुव्‍यवस्‍था संबंधी आढावा बैठक घेण्‍यात आली त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दादाराव केचे, जि. प. अध्‍यक्ष विजय जयस्‍वाल , उपाध्‍यक्ष सुनिल राऊत , जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिना बन्‍सोड, पोलीस अधिक्षक अविनाश  कुमार व संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
    जिल्‍हयातील लोवर वणा प्रकल्‍पाची कामे प्रगती पथावर असल्‍याचे सांगून पालकमंत्री  मुळक म्‍हणाले की, 2011 ते 2012 यावर्षासाठी 121 कोटी 54 लक्ष रुपयाची तरतूद करण्‍यात आली असून, केंद्र शासनाच्‍या मंजूरी नूसार 10 हजार हेक्‍टर सिंचन निर्मितीचे उदिष्‍टे साध्‍य करण्‍याकरीता या प्रकल्‍पाला  अतिरीक्‍त 186 कोटी चा अतिरिक्‍त निधी पूरवणी मागण्‍यात महामंडळा मार्फत सादर  करण्‍यात यावी.  कॅनालची कामे 10 किलो मिटरचा टप्‍पा ठरवून ती कामे टप्‍या टप्‍याने करावी अशा सुचना करून पालकमंत्री म्‍हणाले की,  प्रकल्‍पामुळे बाधित गांवाचे तातडीते पुर्नवसन करुन नागरीकांना द्यावयाचा 18 बाबीच्‍या सुविधा तातडीने पुरविण्‍यात येवून पुर्नवसित गांवाचा  विकास करण्‍यासाठी शासनाकडे निधीचा प्रस्‍ताव पाठवावा त्‍यासठी आपण पाठपुरावा करू असेही ते म्‍हणाले.
विज वितरण व पारेषण कंपणीच्‍या आढावा घेतांना पालकमंत्री म्‍हणाले की, विज मंडळाकडे रक्‍कमेचा भरणा केलेल्‍या  कृषी पंपाची जोडणी तातडीने पूर्ण करावी. हिंगणघाट विभागात कंत्राटी एजन्सीला सुचना देवून कृषिपंपाच्‍या विज जोडणीचे कामे  तातडीने करावे. आष्‍टी येथील राठी या शेतक-याच्‍या विज जोडणीचे काम तातडीने करावे, असे निर्देश यावेळी मंत्रीमहोदयांनी दिले.
कायदा व सुव्‍यवस्‍थेची माहिती जाणून घेवून पालकमंत्री मुळक म्‍हणाले की,  जिल्‍हा नियोजन समितीच्‍या आगामी बैठकीमध्‍ये नाविण्‍यपुर्ण योजने अंतर्गत सिसिटिव्‍हीची  कॅमेरे महत्‍वाच्‍या ठिकाणी बसविण्‍यासाठी निधी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल वर्धेतील किचकट वाहतूक  व्‍यवस्‍थेत सुधारणा करण्‍यासाठी पोलीस विभाग आवश्‍यक ती उपाययोजना करतील. जिल्‍हयातील अवैध धंद्यांना आळा घालण्‍यासाठी पोलीस व महसूल विभागाने समन्‍वयाने कार्य करण्‍याच्‍या सुचना  त्‍यांनी यावेळी दिल्‍या
यावेळी पोलीस विभाग व महसूल विभागातील रिक्‍त पदाची माहिती देण्‍यात आली.  त्‍यावर मंत्रीमहोदय म्‍हणाले की,  पोलीस व महसूल विभागात रिक्‍त पदे असल्‍यामूळे जनसामान्‍याची  कामे तातडीने निघत नाही उलट ती कामे प्रलंबित राहत असतात. रिक्‍त पदे भरण्‍याची कार्यवाही प्रशासकीय स्‍तरावरुन तातडीने करण्‍यासाठी पाठपुरवा केला जाईल अशी ग्‍वाही  यावेळी दिली.
मागासवर्गीय विद्यार्थ्‍यासाठी इ-स्‍कॉल‍रशिप सुरु झाल्‍यामुळे होणारे घोटाळे दुर झाले असून, चालू वर्षामध्‍ये स्‍कॉलरशिपच्‍या अडचणी दुर करण्‍यासाठी मुंबई येथे सामाजिक न्‍याय विभागाचे मंत्री , सचिव व संचालकांनी बैठक आयोजित करून या समस्‍येवर कायमचा तोडगा काढला जाईल. त्‍यामूळे विद्यार्थ्‍यांना व संस्‍थेच्‍या संचालकांना दिलासा मिळेल. असे पालकमंत्री मुळक यांनी त्‍यांना भेटावयास आलेल्‍या संस्‍थेच्‍या शिष्‍टमंडळाला ग्‍वाही दिली
            यावेळी संबधित अधिकारी उपस्थित होते.
                                             0000000

No comments:

Post a Comment