Friday 22 July 2011

राष्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत शेतक-यांना विशेष सवलत


   महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.22 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 22- वर्धा जिल्ह्यात खरीप ज्वारी, सोयाबीन, तुर व कपाशी पिका करीता संपुर्ण तालुके, खरीप भुईमुंग पिका करीता आर्वी ,आष्टी व कारंजा ही तीन तालुके व ऊस पूर्व हंगामी व ऊस खोडवा पिका करीता राश्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत शेतक-यांना विशेष सवलत देण्यात येत आहे.
आर्वी, वर्धा, सेलु, देवळी व ऊस सुरु करीता आर्वी, वर्धा, सेलू, समुद्रपुर या चार तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याला विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतक-यांना 50 टक्के, सर्व पिके व कापूस पिकासाठी अल्प अत्यल्प शेतकरी 75 टक्के व इतर शेतकरी यांना 50 टक्के विशेष सुट देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिसुचित तालुके, अधिसुचित पिके व अधिसुचित मंडळे यांची यादी संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. शेतक-यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतीम तारीख पेरणी पासून 1 महिना किंवा 31 जुलै 2011 यापैकी जी लवकर असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. ऊस पिकासाठी लावनीपासुन 1 महिना किंवा 31 डिसेंबर 2011 तसेच ऊस खोडवा करीता 31 मे 2012 व सुरु ऊसा करीता 31 मार्च 2012 पर्यंत सहभागी व्हायचे आहे.
राष्ट्रीय कृषि पिक विमा योजने अंतर्गत चालू वर्षासाठी ज्वारी या पिकासाठी जोखीम स्तर  60 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 6 हजार 600 आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर अडीच टक्के असून, वर्धा जिल्हयातील अल्प व अत्यल्प सवलतीचा हप्ता रु. 83 व इतर    शेतक-यांना रु. 165, तुर पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 13 हजार 400 आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर अडीच टक्के असून, अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना 168 व इतरशेतक-यांना 335 रुपये , भुईमुंग पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून विमा संरक्षित रक्कम 12 हजार 200 असून, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर साडे तीन टक्के असून,अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी रु. 214 इतरांसाठी 427 रुपये आहे. सोयाबिन पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के असून, विमा संरक्षित रक्कम 8 हजार 500 रुपये व विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर साडे तीन टक्के आहे. अल्प अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी 149 रुपये व इतरांसाठी 298 रुपये आहे. कापूस पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के असून, विमा संरक्षीत रक्कम 16 हजार 600 रुपये, विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 7.60 टक्के असून अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांसाठी 316 रुपये व व इतरांसाठी 631 रुपये आहे. ऊस व पूर्व हंगामी पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के  असून, विमा संरक्षित रक्कम 93 हजार 400 रुपये विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 4.70 टक्के आहे. अल्प व अत्यल्प भुधारकासाठी 2 हजार 195 व इतरांसाठी 4 हजार 390 रुपये आहे. ऊस सुरु पिकासाठी जोखमी स्तर 80 टक्के असून,विमा संरक्षित रक्कम 86 हजार 500 रुपये व विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 5.70 टक्के आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना रु. 2466 व इतरांसाठी 4 हजार 931 रुपये आहे. ऊस खोडवा पिकासाठी जोखीम स्तर 80 टक्के असुन विमा संरखित रक्कम 74 हजार 700 रुपये आहे. विमा हप्त्याचा सर्वसाधारण दर 6.75 टक्के असून, अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यासाठी 2 हजार 521 व इतरांसाठी 5 हजार 049 रुपये सवलतीच्या दराने हप्ता आहे.
सदर योजना पिक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारीत असुन हवामान आधारीत पिक विमा योजनेचा या योजनेशी संबंध नाही. कर्जदार व बिगर कर्जदार दोन्ही शेतकरी सदर योजनेत सहभागी होवु शकतात. सदर योजना शेतक-यांच्या हिताची असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब    ब-हाटे यांनी केले आहे.
                     00000

No comments:

Post a Comment