Tuesday 19 July 2011

दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप.हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.च्या मतदारांची प्रारुप यादी प्रसिध्दीबाबत

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.19 जूलै  2011
--------------------------------------------------------------------------------
           वर्धा,दि.19- दि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व महाराष्ट्र विनिर्दिष्ट सहकारी संस्थांच्या समित्यांवरील निवडणूका नियम 1971 च्या नियम 4 व 5 नुसार दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.या विनिर्दिष्ट सहकारी संस्थेच्या मतदारांच्या प्राथमिक याद्या तयार करुन सदरच्या मतदार याद्या दि. 20 जुलै 2011 (बुधवार) रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. याद्यांच्या प्रती तपासणीकरीता पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत.
          मतदार याद्या जिल्हाधिकारी ,मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय, निवडणूक विभाग, 9 वा मजला, प्रशासकीय इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांची कार्यालये, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची महाराष्ट्र राज्यातील कार्यालये, दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि. हाऊसफिन भवन, प्लॉट नं. सी-21, ई ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-40051, तसेच शाखा व्यवस्थापक, हाऊसिंग फायनान्स येथे सबंधित जिल्ह्याची अ व ब वर्गाची मतदार यादी पहावयास मिळतील.
          सदर याद्यांमध्ये जर नांव समाविष्ठ करावयाची असतील किंवा नावांबाबत आक्षेप किंवा हरकत घ्यावयाची असेल किंवा याद्यांमधील फेरफार अथवा दुरुस्ती सुचविणेची असेल तर तसा दावा किंवा आक्षेप जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक विभाग, 9 वा मजला, प्रशासकीय इमारत, वांदे (पू.), मुंबई -400051 यांचेकडे दि. 1 ऑगस्ट 2011 (सोमवार) पर्यंत मिळेल अशा रितीने पाठवावा. दि. 1 ऑगस्ट 2011 नंतर प्राप्त झालेला दावा किंवा आक्षेप विचारात घेतला जाणार नाही, याची संबंधीतांनी  नोंद घ्यावी , असे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा कळवितात.
                                         000000

No comments:

Post a Comment