Monday 18 July 2011

मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेशाबाबत सुचना

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.18 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.18-शासकीय आर्थिकदृष्ठ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतीगृहामधे सन 2011-12 या शैक्षणिक सत्रात  वर्धा शहरातील मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंत व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.
इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंत प्रवेश अर्जाचे वाटप व स्विकारण्याची मुदत दि. 30 जुलै 2011 आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरीता प्रवेश अर्जाचे वाटप व अर्ज स्विकारण्याची तारीख 1  ते 12 ऑगस्ट 2011 आहे.
प्रवेश अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत मिळतील तथा स्विकारले जातील. माजी विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण संपादन करण्याची अट कायम राहील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे सर्व अंतिम अधिकार निवड समितीस राहील. अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाही. वसतीगृहात अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के, अनुसूचित जाती तथा विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता 15 टक्के जागा राखीव आहेत. सर्व विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी वसतीगृह प्रमुख, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतीगृह,  सामान्य रुग्णालयाचे मागे, इतवारा, वर्धा यांचेशी संपर्क साधावा.
                             000000

No comments:

Post a Comment