Monday 18 July 2011

अंशदायी स्वास्थ्य योजने अंतर्गत रिक्त जागेसाठी अर्ज आमंत्रित

          महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक                  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.18 जूलै  2011
-------------------------------------------------------------------------
       वर्धा, दि. 18- वर्धा व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा व अवलंबितांकरीता  लवकरच अंशदायी स्वास्थ्य योजने अंतर्गत ECHS  पॉलीक्लीनीक सुरु होत आहे. त्याकरीता पुढील प्रमाणे जागा भरावयाच्या आहेत. तरी इच्छूक माजी सैनिकांनी तात्काळ आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांना सादर करावेत.
          पदाचे नांव नर्सिंग असिस्टंट शैक्षणिक पात्रता GNN Diploma/ Class- I (नर्सिंग असिस्टंट कोर्स सैन्यदल) जागा प्रत्येकी  एक, अनुभव 5 वर्षे,  लॅब असिस्टंट साठी शैक्षणिक पात्रता DMLT / Class-I (टेक्नीकल कोर्स सैन्यदल) जागा प्रत्येकी एक अनुभव 5 वर्षे, वाहन चालक या पदासाठी शैक्षणिक पात्रता वर्ग 8 पास, सिव्हीलचा ड्रायव्हिंग परवाना आवश्यक ( क्लास 1 MT Driver- सैन्यदल) जागा प्रत्येकी एक  अनुभव  10 वर्ष जड वाहन चालविण्याचा अनुभव वयोमर्यादा 53 वर्ष , शिपाई शैक्षणिक पात्रता वर्ग 8 पास (जी डी ट्रेड) जागा प्रत्येकी एक अनुभव 5 वर्षे, वयोमर्यादा 53 वर्षे, सफाई कर्मचारी शैक्षणिक पात्रता शिक्षीत प्रत्येकी जागा एक , अनुभव 5 वर्षे वयोमर्यादा 53 वर्षे, महिला सहाय्यक शैक्षणिक पात्रता शिक्षीत जागा प्रत्येकी एक, अनुभव 5 वर्ष वयोमर्यादा 53 वर्ष राहील. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वर्धा कळवितात.
                                        000000

No comments:

Post a Comment