Saturday 1 October 2011

स्वत:च स्वत:करिता बियाणे तयार करा


                       
      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.1 ऑक्टोंबर 2011
------------------------------------------------------------------------------      
     वर्धा,दि.1- हिंगणघाट उपविभागात सोयाबिन या पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढत असल्यामुळे बियाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी शेतक-यांनी घरच्याघरी बियाणे तयार करावे असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र म्हस्के या शेतकरी बांधवाना केले आहे.
     सध्या शेतात असलेल्या अर्धा ते एक एकरातील सोयाबिन हात काढणी पध्दतीने मळणी करुन तयार झालेले बियाणे प्रतवारी करुन व्यवस्थित साठवून ठेवावे. या बियाणांची हालचाल कमी कमी होईल असे व्यवस्थापन करावे. यामुळे उगवण शकती राखण्यास मदत होते. प्रत्येक वर्षी पेरणीस आवश्यक संपूर्ण बियाणे बाजारातून खरेदी करण्याऐवजी फक्त 1 एकर क्षेत्राकरीता प्रमाणित बियाणे खरेदी करुन त्याव्दारे पुढील वर्षाकरीता लागणारे बियाणे आपल्याच शेतात शेतक-यांनी तयार करावे.
     सोयाबिन पिकाची वाढ विभागात समाधान कारक असली तरी सततच्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिक सतत पाहणी खाली ठेवावे. तसेच पिक पक्व अवस्थेत आल्यावर पाने पिवळी पडून गळू लागतात. शेंगा पिवळसर भुरकट होतात       तेव्हा पिक कापणी करावी. मळणी करण्यापूर्वी इतर पिकांची झाडे,तणांची झाडे कापून टाकावे व सोयाबिनची प्रतवारी उत्तम राहिल याची दक्षता घेवून सोयाबिन कोरड्या चांगल्या जागेत साठवून ठेवावे. त्यामुळे बाजारामध्ये सोयाबिनला जास्तीत जास्त भाव मिळू शकेल. ह्या साध्या साध्या गोष्टी केल्यामुळे शेतकरी दरवर्षी भासणा-या बियाण्याच्या तुटवड्या पासून मुक्त राहून आपल्याच दर्जेदार बियाणांची पेरणी करुन दर्जेदार उत्पन्न घेवू शकतो. या करीता अधिक माहिती करीता नजिकच्या मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
                     00000000

No comments:

Post a Comment